अहमदाबाद, 14 सप्टेंबर : गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज बुधवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. याठिकाणी एका बांधकामाधीन इमारतीची लिफ्ट तुटली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सध्या सर्वत्र हाहाकार माजला आहे. मृत्युमुखी पडलेले आठ जण हे सर्व मजूर आहेत. ते गुजरातमधील पंचमहाल येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना अहमदाबाद शहरातील पाजरापोळ चौकाजवळ बांधण्यात येत असलेल्या एका बांधकामाधीन इमारतीत घडली. या इमारतीमधील लिफ्ट तुटली आणि लिफ्ट इमारतीत काम करणाऱ्या 8 कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजता घडली. ही इमारत अस्पायर ग्रुपद्वारे बांधली जात आहे. या इमारतीचे नाव अस्पायर-2 आहे. सर्व मजूर गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील रहिवासी होते. याठिकाणी बांधकाम सुरू होते, यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक - अहमदाबादमधील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बांधकामाधीन इमारतीतील दुर्घटना दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील, अशी आशा आहे. स्थानिक अधिकारी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहेत, असे ते म्हणाले. हेही वाचा - घरात सलग दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्याने आजोबा नाराज, दारू पिऊन घेतला टोकाचा निर्णय पूंछमध्येही मोठा बस अपघात - दरम्यान, याआधी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मिनी बस खोल दरीत कोसळून नऊ जण ठार झाल्याचीही घटना घडली. तर 27 जण जखमी झाले होते. बसमध्ये सुमारे 36 प्रवासी प्रवास करत होते आणि हा रस्ता मैदान ते पूंछकडे जात होता. मात्र, सावजियांच्या हद्दीतील बरारी नाल्याजवळ बसला अपघात झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







