उदयपूर, 31 डिसेंबर: एक मोठी बातमी (Big News) समोर येत आहे. ओमायक्रॉनमुळे (Omicron) देशात दुसरा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशात आता दुसरा मृत्यू झाला आहे. उदयपूरमध्ये (Udaipur) 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मात्र 21 डिसेंबर रोजी रुग्ण कोरोना निगेटिव्ह (corona negative) आला होता. 25 डिसेंबर ला रुग्णाला omicron व्हेरिएंटचा (omicron variant) संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाची लागण झाल्यापासून रुग्ण रुग्णालयात दाखल होता. वैद्यकीय विभाग पोस्ट कोविड न्यूमोनियाचा परिणाम असल्याचं म्हणत आहे. मृत रुग्णाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता. Omicronचा पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन राज्यात गुरुवारी तब्बल 198 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालीय. यापैकी एका रुग्णाच्या मृत्यूची (death) देखील नोंद झाली आहे. ज्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय खरंतर त्याचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालंय. त्याचा NIA रिपोर्ट गुरुवारी समोर आला आहे. त्यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झााली होती, अशी माहिती समोर आली आहे. पण रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे. हेही वाचा- वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण- भय्यू महाराजांचा हा फोटो का होतोय व्हायरल पिंपरी चिंचवड महापालिकेकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील गुरुवारी तीन रुग्णांना एनआयव्ही रिपोर्ट समोर आले आहेत. यामध्ये तीन जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यापैकी एकजण हा नायजेरिया येथून आला होता. तर उर्वरित दोन रुग्ण हे त्याचे निकटवर्तीयच असल्याचं समोर आलं आहे. नायजेरिया येथून आलेल्या रुग्णाचा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील रुबी एलकेअर कार्डीयाक सेंटर येथे 28 डिसेंबरला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या रुग्णाचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट समोर आला. या रुग्णाची ओमायक्रॉनची लागण प्रासंगिक निदान असल्याचं महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. राज्यावर नववर्षात मोठे संकट राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात गुरुवारी एकाच दिवसात 85 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहोचली आहे. हेही वाचा- लग्नात झालेल्या वादाची 3 वर्षांनी आली आठवण; पुण्यातील तरुणाने बुक्की मारून पत्नीचा पाडला दात राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना रुग्णाबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 85 ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये मुंबईत 34, नागपूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहे. पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॅान रूग्णांचा आकडा आता 252 वर पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







