Corona Vaccination: 'या' 20 आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना 1मार्चपासून मिळणार कोरोना लस, वाचा संपूर्ण यादी

Corona Vaccination: 'या' 20 आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना 1मार्चपासून मिळणार कोरोना लस, वाचा संपूर्ण यादी

दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या लसीकरणासाठी 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या आणि 45 वर्षापेक्षा अधिक वयाच्या इतर आजारांनी ग्रासलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. या आजारांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : कोरोनासोबत (Corona) लढ्यासाठी भारतात जगभरातील सर्वात मोठी लसीकरण (Vaccination) मोहिम राबवली जात आहे. यादरम्यान दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या लसीकरणासाठी 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या आणि 45 वर्षापेक्षा अधिक वयाच्या इतर आजारांनी ग्रासलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. खासगी रुग्णालय या लसीकरणासाठी 250 रुपयांपर्यंत शुल्क घेऊ शकतात. ही माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली आहे. तर, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केलं जाणार आहे.

सरकारनं शनिवारी 45 ते 59 वर्षाच्या नागरिकांमधील 20 आजारांबद्दलची माहिती जारी केली आहे. कोणताही व्यक्ती या आजारांनी ग्रस्त असेल तर त्यांना लस दिली जाणार आहे.

1) मागील एका वर्षात हृदयविकाराच्या झटक्यामुळं रुग्णालयात दाखल झालेले व्यक्ती

2) पोस्ट कार्डियक ट्रान्सप्लांट / लेफ्ट वेंट्रिक्युलर सहाय्य डिव्हाइस(LVAD)

3) सिग्निफिकंट लेफ्ट वेट्रीकुलर सिस्टोलिक डिसफंशन

4) मॉडरेट किंवा वेल्वुलर हार्ट डिसीज

5) जन्मजात असणारे हृदयासंबंधीचे आजार आणि सिवियर पीएएच किंवा इडियोपॅथिक पीएएच

6) हृद्य रक्तवाहिन्यांचा विकार आणि उच्च रक्तदाब किंवा मधुमेह

7) एन्गिना आणि उच्च रक्तदाब / मधुमेह उपचार

8) सीटी/एमआरआय डॉक्युमेंट स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब/ मधुमेह

9) फुफ्फुसीय धमनी उच्च रक्तदाब आणि मधुमेह

10) 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून असणारा मधुमेह आणि उच्च रक्तदाब

11) मूत्रपिंड / यकृत / हेमॅटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण केलेले रुग्ण

12) हेमोडायलिसिस / सीएपीडीवर शेवटच्या टप्प्यात पोहोचलेले मूत्रपिंडासंबंधीचे आजार

13) सध्या ओरल कोर्टिकोस्टेरॉयचा वापर करत असणाऱ्या व्यक्ती

14) डिकंपेन्सेटेड सिरोसिस

15) मागील दोन वर्षात श्वासनासंदर्भातील गंभीर आजारानं रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण

16) लिम्फोमा / ल्यूकेमिया / मिलोमा

17) 1 जुलै 2020 किंवा त्यानंतर कर्करोगाची पुष्टी झालेले किंवा कॅन्सर थेरपी घेणारे रुग्ण

18) सिकल सेल रोग / अस्थिमज्जा निकामी होणं / अप्लास्टिक एनेमिया / थॅलेसीमिया मेजर

19) प्राथमिक इम्यूनोडिफिसिएंसी रोग/ एचआयव्ही संक्रमण

20) अपंगत्व / स्नायू डिस्ट्रोफी/ अॅसिड हल्ल्यामुळे श्वासनास त्रास होणाऱ्या व्यक्ती / अत्याधिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती / अंधत्व / बहिरेपणा

Published by: Kiran Pharate
First published: February 28, 2021, 11:50 AM IST

ताज्या बातम्या