Home /News /national /

दोन वर्षाच्या चिमुकलीमुळं आईला मिळालं जीवदान; रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या महिलेचे वाचले प्राण

दोन वर्षाच्या चिमुकलीमुळं आईला मिळालं जीवदान; रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या महिलेचे वाचले प्राण

Girl Save Mother's Life: मुरादाबाद (Moradabad) रेल्वे स्टेशनवर एक काळजाला भिडणारी घटना घडली आहे. एका दोन वर्षांच्या (Two Year Old Girl)चिमुकलीनं आपल्या आईचे (Mother Daughter) प्राण वाचवले आहेत.

    उत्तर प्रदेश, 04 जुलै: मुरादाबाद (Moradabad) रेल्वे स्टेशनवर एक काळजाला भिडणारी घटना घडली आहे. एका दोन वर्षांच्या (Two Year Old Girl) चिमुकलीनं आपल्या आईचे (Mother Daughter) प्राण वाचवले आहेत. ही संपूर्ण घटना ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रविवारी एक महिला मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर बेशुद्ध होऊन पडली. ही बघून तिची दोन वर्षांची चिमुकली रडायला लागली. पण त्यानंतर या चिमुकलीनं असं काही केलं की, रेल्वे स्टेशनवरील RPF जवानही हैराण झाले. आपल्या आईला बेशुद्ध पाहिल्यानंतर ही चिमुकली रडत होती. त्यानंतर तिची नजर दूर उभ्या असलेल्या RPF महिला कॉन्स्टेबलकडे गेली. महिला कॉन्स्टेबलला पाहताच मुलगी तिच्या जवळ गेली आणि तिचा हात पकडला. हे बघून अन्य RPF जवान हैराण झाले. काही वेळासाठी या RPF जवानांना काही कळत नव्हतं की या मुलीला नेमकं काय म्हणायचं आहे. चिमुकली महिला कॉन्स्टेबलचं बोटं पकडून तिला खेचत होती. त्यानंतर महिला कॉन्स्टेबल तिच्यासोबत चालायला लागली. काही पावलं चालल्यानंतर महिला कॉन्स्टेबलची नजर बेशुद्ध पडलेल्या महिलेवर पडली. त्यानंतर या झालेला प्रकार कॉन्स्टेबलच्या लक्षात आला. तात्काळ या बेशुद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हेही वाचा- Video:सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, खासदारांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम  नेमकी घटना काय? ही घटना सकाळी 8 वाजता घडली आहे. महिलेचं वय साधारण 30 वर्ष असेल. या महिलेसोबत एक 6 महिन्याचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी होती. सहा महिन्यांचा मुलगा त्याच्या आईच्या अंगावर पडून होता. महिला कॉन्स्टेबलनं या घटनेची माहिती तात्काळ GRP ला दिली. GRP ने महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या महिलेची ओळख अजून पटली नसल्याचं GRP निरीक्षकानं सांगितलं. GRPनं चाइल्ड प्रोटेक्शन टीमला मुलांची माहिती दिली असून सध्या जीआरपी मुलांची देखभाल करत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Daughter, India, Mother, Railway, Uttar pardesh

    पुढील बातम्या