कोरोनाच्या नियमांचा बोजबारा औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम

कोरोनाच्या नियमांचा बोजबारा औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम

MP Imtiaz Jalil: लॉकडाऊन (Weekend Lockdown) असतानाही रात्री 12 पर्यंत कव्वालीचा कार्यक्रम (Qawwali event) आयोजित करण्यात आला होता.

  • Share this:

औरंगाबाद, 04 जुलै: राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोकाही दर्शवला आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचा बोजबारा उडालेला दिसतो.

औरंगाबादमध्येही (Aurangabad )अशीच एक घटना घडली आहे. विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) असतानाही रात्री 12 पर्यंत कव्वालीचा कार्यक्रम (Qawwali event) आयोजित करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे या कव्वालीच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Aurangabad MP Imtiaz Jalil)ही देखील उपस्थित होते.

औरंगाबादमध्ये सध्या विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच काल रात्री 12 वाजेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कव्वालीच्या कार्यक्रमाला शेकडोंची गर्दी जमली होती. विशेष म्हणजे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील देखील या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत सहभागी होते.

दौलताबाद रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये शनिवारी मध्यरात्री पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. खासदार जलील यांचा कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Published by: Pooja Vichare
First published: July 4, 2021, 2:01 PM IST

ताज्या बातम्या