राजकोट, 8 जून: गुजरातमधील राजकोट येथील धंजी धरणाजवळील ओव्हर ब्रिजची भिंत अचानक कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दबलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आलं आहे. दोघांना रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉक्टरांना दोघांना मृत घोषित केलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनजी धरणाजवळील हायवेच्या ओव्हरब्रिजची एक भिंत पावसामुळे अचानक कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून रस्त्यानं जाणाऱ्या दोन दुचारीस्वारांचा मृत्यू झाला.
जेसीबी मशीनच्या मदतीने ढिगाऱ्याखालील मृतदेह बाहेर काढण्यात आले. विजय करन वीरडा (24) आणि भावेश उर्फ भूपत नाथा मियात्रा (25) अशी मृतांची नाव आहेत. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.