मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Natural Energy Drinks : ऊर्जा वाढवण्यासाठी ही 5 नैसर्गिक पेय प्या, आरोग्यालाही होईल फायदा

Natural Energy Drinks : ऊर्जा वाढवण्यासाठी ही 5 नैसर्गिक पेय प्या, आरोग्यालाही होईल फायदा

Natural Energy Drinks: नैसर्गिक पेये चवीला चांगली असण्यासोबतच शरीरात ऊर्जा वाढवण्‍याचं (Energy Booster Drinks) काम करतात, त्यामुळं आपल्याला ताजेतवाने वाटते.

Natural Energy Drinks: नैसर्गिक पेये चवीला चांगली असण्यासोबतच शरीरात ऊर्जा वाढवण्‍याचं (Energy Booster Drinks) काम करतात, त्यामुळं आपल्याला ताजेतवाने वाटते.

Natural Energy Drinks: नैसर्गिक पेये चवीला चांगली असण्यासोबतच शरीरात ऊर्जा वाढवण्‍याचं (Energy Booster Drinks) काम करतात, त्यामुळं आपल्याला ताजेतवाने वाटते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : शरीराला ऊर्जा देण्याच्या नावाखाली अशी अनेक शीतपेये (Cold Drinks) बाजारात उपलब्ध आहेत, जी शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान करतात. हे माहीत असतानाही लोक याचं सेवन करतात. पण शरीर सुदृढ ठेवण्यासाठी कार्बोनेटेड पेयांऐवजी नैसर्गिक पेयांचं (Natural Drinks) सेवन करणं आवश्यक आहे. नैसर्गिक पेये चवीला चांगली असण्यासोबतच शरीरात ऊर्जा वाढवण्‍याचं (Energy Booster Drinks) काम करतात, त्यामुळं आपल्याला ताजेतवाने वाटते. बहुतेक नैसर्गिक पेयांचं वैशिष्ट्य म्हणजे ती चवदार असतातच; मात्र, प्रक्रिया केलेल्या पेयांप्रमाणे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Natural Energy Drinks) वाढवत नाहीत. शिवाय, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती आरोग्यदायी (Healthy) असतात.

आहारतज्ज्ञ (Nutritionist) लवनीत बत्रा यांच्या मते, नैसर्गिक पेये शरीराची ऊर्जा वाढवण्याचं काम करतात. त्यांनी आपल्या एका इन्स्टा पोस्टमध्ये 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्सची माहिती देखील शेअर केली आहे, जी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि शरीराला ऊर्जा देतात. चला जाणून घेऊया त्या नैसर्गिक पेयांबद्दल.

1. नारळ पाणी (Coconut Water) - नारळ पाणी हे सर्वोत्तम नैसर्गिक आरोग्य पेय मानले जाते. जास्त व्यायाम, धावपळ, आजारपण, गर्भावस्था किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीर थकल्यासारखं वाटत असेल तर नारळपाणी प्यायल्यानं थकवा दूर होतो. नारळाच्या पाण्यात 90 टक्क्यांहून अधिक पाणी असतं. परंतु, ते खनिजांनी समृद्ध आहे. हे नैसर्गिकरित्या गोड असते आणि त्यात 10 पट जास्त पोटॅशियम असते.

2. जलजीरा (Jaljeera) - जर तुम्हाला किंचित तुरट चवीनं ताजेतवानं करायचं असेल, तर जलजीरा हे एक परिपूर्ण नैसर्गिक ऊर्जादायी पेय (Energy Booster Health Drink) असू शकते. जिरे हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा मसाला आहे. हा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले घटक पोट बिघडल्यानं पोटात आणि ओटीपोटात येणाऱ्या कळांवर (Abdominal cramps) खूप उपयुक्त आहेत. तथापि, जलजीरा मर्यादित प्रमाणात सेवन करणं केव्हाही चांगलं.

हे वाचा - रावत कुटुंबाचं सैन्यदलाशी जन्माचं नात, पत्नीचाही जिव्हाळ्याचा संबंध, दोन मुलींवर दु:खाचा डोंगर

3. उसाचा रस (Sugarcane Juice) – उसाचा रस नैसर्गिकरित्या खूप चांगलं ऊर्जा आणि आरोग्यदायी पेय आहे. उन्हाळ्यात उसाच्या रसाचे सेवन करणं खूप फायदेशीर आहे. हे लोह, प्रथिने, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. उसाचा रस शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्यावर (Dehydration) आणि थकवा (Fatigue) दूर करण्यासाठी गुणकारी आहे.

हे वाचा  -चित्ता हेलिकॉप्टरच्या त्या अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते, आज झाला घात

4. कोम्बुछा (Kombucha) - कोम्बुछा हा मुळात आंबवलेला चहा (Fermented Tea) आहे. यात अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यात बी जीवनसत्त्वं, ग्लुकोरोनिक अ‌ॅसिड आणि मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट (Antioxidant) समृद्ध पॉलिफेनॉल (Polyphenols) असतात. यात प्रोबायोटिक बॅक्टेरिया (Probiotic bacteria) आणि अ‌ॅसेटिक अॅसिड देखील असते, जे आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्याचं काम करतं.

5. सत्तू (Sattu) - सत्तू हे गरीब लोकांचे प्रोटीन मानले जाते. सत्तूमध्ये पोषक तत्त्वं मुबलक प्रमाणात असतात. त्यात लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज असते. त्यात सोडियमचं प्रमाणही कमी असतं. यामुळे शरीराला झटपट ऊर्जा तर मिळतेच. शिवाय, शरीर थंड ठेवण्यासही मदत होते. यामुळंच उन्हाळ्यात सत्तू खाल्ला जातो. हे अंतर्गत अवयवांना आराम देतं.

First published:

Tags: Drink water, Health, Health Tips, Lifestyle