या आगीत ए वन आणि ए टू या दोन एसी बोगीज जळून खाक झाल्या आहेत. हे दोन डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहेत. इतर डब्यांत धूर घुसल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही वेळातच ही ट्रेन ग्वालियरकडे रवाना होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. जीवितहानी टळली ही आग भडकण्यापूर्वीच रेल्वेतील सर्व प्रवासी खाली उतरले असल्यामुळे त्यात कुणाचाही बळी गेला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. रेल्वे मंडळाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीची कल्पना मिळाल्यानंतर तातडीनं स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. अग्निशमन दलाचे 8 बंद घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण अस्पष्ट ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. फॉरेन्सिक तपासणीनंतर या कारणांचा खुलासा होऊ शकेल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.BurningTrain : वैष्णोदेवीहून येत असलेल्या दुर्ग-उधमपुर एक्सप्रेसला शुक्रवारी दुपारी अचानकआग लागली. मुरैना-धौलपुर च्या दरम्यान एसी डब्यांनी पेट घेतल्याने घबराट उडाली. यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. pic.twitter.com/AYtPMY4UhI
— News18Lokmat (@News18lokmat) November 26, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Burning train, Fire, Madhya pradesh