• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ट्विटरनं हटवली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अकाउंटची ब्लू टिक

ट्विटरनं हटवली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अकाउंटची ब्लू टिक

ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवली आहे (Twitter withdraws blue tick from personal handle of Venkaiah Naidu) . याचच अर्थ ट्विटरनं उपराष्ट्रपतींचे अकाउंट अनव्हेरिफाइड केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 05 जून : ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवली आहे (Twitter withdraws blue tick from personal handle of Venkaiah Naidu) . याचच अर्थ ट्विटरनं उपराष्ट्रपतींचे अकाउंट अनव्हेरिफाइड केलं आहे. ट्विटरच्या अटी आणि नियमांनुसार एखाद्या हँडलचं नाव बदललं गेलं किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल, अपडेट नसेल तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ब्लू टिक हटवली जाते. दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हँडलसमोर ब्लू टीक असेल मात्र नंतर त्यानं कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण करत नसल्यास ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक का हटवली असा प्रश्न उपस्थित करताना हा भारताच्या संविधानावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं नवं ट्वीट; शेअर केला 'हा' ऐतिहासिक फोटो ट्विटरवरील ब्लू टीक ही एखादं अकाउंट मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीचं अधिकृत अकाउंट असल्याचं दर्शवत असते. यात सरकारी कंपन्या, मोठे ब्रॅन्ड, मोठ्या संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि इतर बड्या व्यक्तींचा समावेश असतो. सरकारच्या नव्या गाइडलाइनवरून ट्विटर आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. नव्या गाइडलाइन लागू करण्याबाबत ट्विटरने अद्याप काही सकारात्नमक अशी भूमिका मांडलेली नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: