मुंबई 1 सप्टेंबर : ट्वीटर हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला बरीच माहिती मिळते. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी आणि पॉलिटिकल व्यक्तिमत्वापर्यंत सगळेच लोक येथे सक्रिय असतात आणि त्यांचे नवीन प्रोजेक्ट किंवा आयुष्याशी संबंधीत माहिती ते आपल्या फॉलोअर्सना देत असतात. येथे फोटो, व्हिडीओ आणि टेक्स फॉरमॅटमध्ये आपल्याला माहिती मिळते. ज्यामुळे हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, हे म्हणायला काही हरकत नाही. ट्वीटर नेहमीच आपल्या युजर्ससाठी काहीना काही अपडेट घेऊन येत असतं, ज्यामुळे हे प्लॅटफॉर्म वापरणं सोपं होतं. आता देखील ट्विटरने नवीन फीचर आणल आहे. ज्यामध्ये एखाद्याने ट्वीट पाठवल्यानंतर देखील त्याला एडिट करता येणं शक्य आहे. यासाठी ट्वीटरने आता एक एडिट बटणाचा पर्याय सुरू केला आहे. जे सुरूवातीला देण्यात आला नव्हाता. खरंतर आधी एखाद्या युजरने काहीही लिहून पोस्ट केलं तर, त्याला आपलं ट्वीट किंवा शब्द बदलता येत नव्हते. यासाठी त्याला एकतर ते ट्वीट आहे त्या परिस्थीत राहू द्याव लागत होतं किंवा मग ते सरळ हटवावं लागतं होतं. ज्यामुळे बऱ्याच लोकांना अडचण येत होती. ट्वीटरने युजर्सची अडचण लक्षात घेता आता ही नवीन सुविधा आणली आहे. परंतू ट्वीटरने सध्या ही सुविधा व्हेरिफाईड खात्यांनाच दिली आहे. त्यामुळे इतर लोकांसाठी अद्याप हा पर्याय खुला नाही. परंतु काही काळाने हा पर्याय त्यांना दिला जाऊ शकतो.
हे कसं करता येईल? ट्विटरवर आता युजर्सना एडिट बटणाचा पर्याय दिसेल, ज्यावर जाऊन ते माहिती ए़डिट करु शकता. परंतू हे ट्विट पाठवल्यानंतर फक्त 30 मिनिटांपर्यंत एडिट करता येऊ शकतं. त्यानंतर हा पर्यात उपलब्ध राहाणार नाही. तसेच ट्वीट पाहून लोकांना कळेल की, हे पाठवलेल्या व्यक्तीन ते एडिट केलेले आहे. म्हणजेच काय तर त्या युजरच्या ट्विटची एडिट हिस्ट्री देखील दिसेल. तसेच त्याने काय एडिट केलं आहे किंवा कोणत्या शब्द बदलला आहे. हे हिस्ट्रीमध्ये दिसेल.