Home /News /national /

Coronavirus कुणामुळे? चीन की अमेरिका? भारताने कुणाची बाजू घेतली पाहा

Coronavirus कुणामुळे? चीन की अमेरिका? भारताने कुणाची बाजू घेतली पाहा

कोरोना व्हायरसवरून चीन आणि अमेरिका यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. भारतानं मात्र यावर बाळगलं मौन.

    नवी दिल्ली, 25 मार्च : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. दरम्यान, कोरोना व्हायरसवरून चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरससाठी कोण जबाबदार यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप हे दोन्ही देश करत आहेत. यात भारताने मात्र मौन बाळगलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी संवाद साधला. यावेळी वांग यांनी अमेरिकेकडून कोरोनाला चायनिज व्हायरस म्हटलं गेलं त्याविरोधात भारतानं भूमिका घ्यावी असं म्हटंल. वांग यी यांनी अमेरिकेकडून चीनवर करण्यात आलेल्या आरोपांना भारतानं विरोध करावा अशी विनंती केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला चायनिज व्हायरस असं म्हटलं होतं तर अमेरिकेचे सचिन माइक पोम्पेओ यांनी वुहान व्हायरस असं नाव दिलं. त्यानंतर वांग यी यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकगर यांच्याशी चर्चा झाली. चर्चेनंतर चिनी माध्यमांनी याबाबतचं वृत्त देताना भारत कोरोना व्हायरसच्या लेबलिंगवर सहमत नाही असं म्हटलं आहे. चिनी माध्यमांनी जरी भारताची भूमिका कोरोना व्हायरसच्या लेबलिंगला अनुकूल नाही अशी सांगितली असली तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या वांग यी यांच्याशी कोरोना व्हायरसबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं. कोरोना हे एक जगासमोरचं आव्हान असून आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. मात्र जयशंकर यांनी कोरोना व्हायरसच्या लेबलिंगवर सहमत किंवा असहमत असल्याचं स्पष्ट केलं नसून भारताने याव मौन बाळगलं आहे. चिनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चिनी व्हायरस या शब्दाच्या वापरावर मात्र विऱोध दर्शवण्यात आला आहे. अमेरिकेवर यावरून टीका करण्यात आली. चीनने आतापर्यंत दोनवेळा याबाबत स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेत काही व्यक्ती जाणीवपूर्वक कोरोना व्हायरसला चीनशी जोडून देशाची प्रतिमा बिघडवत आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि आतंरराष्ट्रीय संघटनांनी स्पष्टपणे म्हटलंय की कोणत्याही व्हायरसला एखाद्या देशाला किंवा भागाला जबाबदार धरता येणार नाही. हे वाचा : ब्रिटनला कोरोनाचा झटका, प्रिन्स चार्ल्स यांनाही व्हायरसचा विळखा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या