तिरुवनंतपुरम, 20 जुलै : आजकाल प्रवास खूपच सुलभ झाला आहे. अवघ्या काही तासांतच आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फक्त महाराष्ट्रातून केरळला पोहोचण्यासाठी एका ट्रकला काही तास, काही आठवडे, काही महिने नाही तर चक्क एक वर्ष लागलं आहे. जुलै 2019 मध्ये महाराष्ट्रातून (maharashtra) रवाना झालेला हा ट्रक (truck) जुलै 2020 मध्ये केरळमध्ये पोहोचला आहे. या ट्रकला तब्बल 38 चाकं आहे. जवळपास 1700 किमी प्रवास करून हा ट्रक महाराष्ट्राच्या (Maharashtra) नाशिकमधून (nashik) केरळच्या (Kerala) तिरुवनंतपुरमध्ये (Thiruvananthapuram) पोहोचला आहे.
Kerala: A truck, carrying an aerospace horizontal autoclave for delivery to Vikram Sarabhai Space Centre in Thiruvananthapuram, reached the city today a year after starting from Maharashtra. Staff say, "Started in July 2019 & travelled across 4 states. Hope to deliver this today" pic.twitter.com/XNaCjXa1C3
— ANI (@ANI) July 19, 2020
केरळच्या तिरुवनंतरपुरमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरवर (Vikram Sarabhai Space Centre) महाराष्ट्रातील नाशिकमधून एअरोस्पेस क्षैतिज ऑटोक्लेवची (aerospace horizontal autoclave) डिलीव्हरी करायची होती. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या मशीनचे भाग वेगवेगळे करू शकत नाही. शिवाय मशीनच्या आकारामुळे जहाजातून नेणंही शक्य नव्हतं. त्यामुळे मशीनला अशा मोठ्या ट्रकने आणण्याचा विचार केला. एका ट्रकमार्फत रोडमार्गे या ऑटोक्लेव्हची डिलीव्हरी करण्याचं ठरलं. हे वाचा - मुंबईत थोडक्यात टळली रेल्वे दुर्घटना, रुळावरच उभा होता डंपर, पाहा हे PHOTOS जुलै 2019 साली या ट्रकचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्रातून केरळात पोहोचण्यासाठी चार राज्यांचा प्रवास केला, असं या ट्रकमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. या ट्रकवर तब्बल 78 टन वजनाचा भार होता. इतकं वजन घेऊन जाणाऱ्या या ट्रकची सुरक्षाही महत्त्वाची होती. ट्रकच्या सुरक्षेचा विचार करता पोलिसांची गाडीदेखील या ट्रकसह होती. शिवाय या ट्रकच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये हेदेखील गरजेचं होतं. त्यासाठी ज्या रस्त्यावरून हा ट्रक जाणार त्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली. झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आणि विजेचे खांबही हटवण्यात आले. जेणेकरून ट्रकच्या मार्गात कोणता अडथळा येणार नाही.

)







