मुंबईत आज एका रेल्वे अपघाताची दुर्घटना थोडक्यात टळली. एका मेल एक्स्प्रेसने रुळावर उभ्या असलेल्या मालवाहू डंपरला धडक दिली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खड्डी घेऊन हा डंपर जात होता. त्यावेळी येणाऱ्या एक्स्प्रेसने धडक दिली. मोटरमनने वेळीच वेग कमी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघाताची पश्चिम रेल्वे चौकशी करत आहे.
सध्या रेल्वेमार्गावर अनेक काम सुरू आहेत. या कामदारम्यान कंत्राटदाराचा हा ट्रक तिथे उभा करण्यात आला होता.