मराठी बातम्या /बातम्या /देश /CCTV Video : भरधाव ट्रकची दोन विद्यार्थिनींसह दुकानदाराला धडक, घटनेचं धक्कादायक फुटेज

CCTV Video : भरधाव ट्रकची दोन विद्यार्थिनींसह दुकानदाराला धडक, घटनेचं धक्कादायक फुटेज

गुरुवारी सकाळी ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थिनी आणि एक दुकानदार जखमी झाला आहे.

गुरुवारी सकाळी ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थिनी आणि एक दुकानदार जखमी झाला आहे.

गुरुवारी सकाळी ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थिनी आणि एक दुकानदार जखमी झाला आहे.

हिमाचल प्रदेश, 25 नोव्हेंबर: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh)ऊना जिल्ह्यात (Una Truck Accident) गुरुवारी सकाळी ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थिनी आणि एक दुकानदार जखमी झाला आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ट्रक सुमारे 50 मीटर पर्यंत फरफटत गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गगरेट कस्बे शहरातील ही घटना आहे. ट्रकचा अपघात झाला. यातला ट्रक जवळपास 50 मीटरपर्यंत घसरत गेला. यावेळी ट्रकनं दुकानदार आणि शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींना धडक दिली आहे. हा ट्रक होशियारपूरहून फ्लोर टाइल घेऊन येत होता. याच दरम्यान अनियंत्रितपणे ट्रक उलटला आणि भरधाव वेग असल्यानं उलटल्यानंतर ट्रक घसरत गेला.

हेही वाचा-  स्वबळाचा नारा देणाऱ्या Congressला झटका, NCP नं उचचलं मोठं पाऊल

यादरम्यान ट्रकनं दुकानाचे काउंटर तोडून दुकानदाराला धडक दिली. नंतर शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींना पायदळी तुडवल्यानंतर तो ट्रक शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय गगरेटच्या मैदानात जाऊन आदळला.

शाळेत कोणीच नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

कोरोनाच्या काळात प्रार्थना सभेवर बंदी असल्याने मैदानात विद्यार्थी नव्हते हे सुदैवाने, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. जखमी विद्यार्थिनींवर सिव्हिल हॉस्पिटल गगरेट येथे प्राथमिक उपचार केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना कुटुंबियांनी उपचारासाठी होशियारपूर येथे नेलं आहे.

" isDesktop="true" id="634958" >

आतापर्यंत याठिकाणी अनेक वाहनांचा अपघात झाला आहे. तर एका दुमजली दुकानाचंही नुकसान झालं आहे. मात्र या अपघातस्थळावर आजतागायत कोणताही तोडगा निघालेला नाही. घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश ठाकूर यांनीही घटनास्थळ गाठून विद्यार्थिनींवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली.

First published:

Tags: Himachal pradesh