भारतातील सब-400 सीसी मोटारसायकल स्पेससाठी जुलै महिना अनेक घडामोडींनी भरलेला असणार आहे. कारण या सेगमेंटमध्ये हार्ले डेव्हिडसन आणि ट्रायम्फसारखे जागतिक खेळाडू अनुक्रमे हिरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटोसारख्या भारतीय उत्पादकांसोबत प्रथमच 400 सीसी स्पेसमध्ये उतरत आहेत. ‘ट्रायम्फ स्पीड 400’ ही ट्रायम्फ-बजाज ऑटो अलायन्समधून जन्माला आलेली पहिली मोटारसायकल आहे. 2.33 लाख रुपये किंमत असलेली ही गाडी ट्रायम्फची सर्वात परवडणारी ऑफर आहे. 1. ट्रायम्फ स्पीड 400च्या चेसीवरील वेल्ड्स, नीटनेटकी वायरिंग, मडगार्ड बिट्सवरील पावडर-टेक्स्चर फिनिश, क्लॅम्प्सची गुणवत्ता, ग्लॉस-फिनिश टँक, इंजिनवरील मशीन-फिनिश फॅन्स, स्टेनलेस-स्टील एक्झॉस्ट कॅन अशा सर्व गोष्टी एकदम टॉप-ड्रॉअर आहेत. गाडीच्या समोरील बाजूला असलेल्या डीआरएलसह दोन्ही बाजूंना एलईडी लाईट्स आहेत. जे याच कंपनीच्या मोठ्या बाईक्सची आठवण करून देतात. या शिवाय, चंकी गोल्डन यूएसडी फ्रंट फोर्क आणि त्याच्यावर बार-एंड मिररसह बसवलेला रुंद हँडलबार बाइकच्या लूकला रेट्रो-माचो अपील देतो.
2. लिक्विड-कूल्ड इंजिन, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, बेंच सीट, टेल सेक्शन, पॅनेल या सर्व बाबी विचारपूर्वक डिझाइन केलेल्या दिसत आहेत. इन्स्ट्रुमेंट कन्सोलमधील अॅनालॉग स्पीडोमीटर आणि डिजिटल एलसीडी स्क्रीन आहे. जी दोन ट्रिप, वेळ, इंधनाची पातळी, सरासरी इंधन वापर आणि गिअर पोझिशन इंडिकेटर दर्शवते. अगदी मोठ्या महागड्या ट्रायम्फ मोटारसायकलींप्रमाणे या ट्रायम्फसह कोणतीही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही. पण, त्याच्या अभावामुळे तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. गाडीला यूएसबी सॉकेट देण्यात आलेलं आहे. 3. ट्रायम्फ स्पीड 400मध्ये लिक्विड-कूल्ड इंजिन, स्लिपर क्लच आणि राइड-बाय-वायर थ्रॉटल ही सर्व फीचर्स आहेत. गाडी रस्त्यावर उतरल्यानंतर ही फीचर्स खरोखर उपयुक्त आहेत. 398सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड मोटर हे या गाडीचं सर्वात महत्त्वाचं फीचर आहे. ते जास्तीत जास्त 40PS पॉवर आणि 37.5Nm टॉर्कची निर्मिती करते. सिक्स-स्पीड गिअरबॉक्सशी ही मोटर जोडलेली आहे. घरात पैसा टिकून राहण्यासाठी चाणक्याची ही नीती, संपत्तीत सतत होत राहील वाढ 4. ट्रायम्फच्या नवीन टीआर-सिरीज इंजिनमध्ये बजाजच्या Dominar 400 प्रमाणेच 80mm बोअर आहे. पण, त्याची रचना आणि कामामध्ये ते खूप वेगळं आहे. हे इंजिन 3,000rpm वर जास्तीत जास्त 80 टक्के टॉर्क निर्माण करून कमी-मध्यम-श्रेणीमध्ये बाईकला चांगलं स्थान देतो. 5. 4-व्हॉल्व्ह डीओएचसी इंजिन एकदम क्लीन पुल होतं. गाडीचा पहिला गिअर लहान आहे. पण, हाय कॉग्सचं हे गिअरिंग स्पॉट ऑन आहे. सध्याच्या काळातील सर्वात ट्रॅक्टेबल सिंगल-पॉट मोटर्समध्ये त्याचा समावेश होतो. या मोटारसायकलमध्ये 100-110kmphचा स्पीड गाठला आणि पटकन ब्रेक दाबून स्पीड अगदी 35kmph वर आणला तरीही इंजिनला काही फरक पडत नाही. सहाव्या गिअरमध्ये गाडी उत्तम चालते. एकूणच तुम्हाला रोज चालवायला आवडेल इतकी ही बाईक जबरदस्त आहे. 6. स्पीड 400 ची रचना ट्रायम्फनं ग्राउंड अप केली आहे आणि बजाजनं ती पूर्णपणे तयार केली आहे. ती हाताळण्याच्या पद्धती आणि गतिमानतेच्या बाबतीत ही गाडी कोणत्याही चांगल्या गुणवत्तेच्या मोटरसायकलसारखीच वाटते. या मोटारसायकलवर तुम्ही अगदी सरळ स्थितीत बसलात तरी तुमच्या तळहातावर कोणताही ताण न पडता तुम्ही रुंद हँडलबारपर्यंत सहज पोहचू शकाल. 7. या गाडीची चेसी ही या मोटरसायकलबद्दल आणखी एक उल्लेखनीय गोष्ट आहे. ज्यामुळे ती अवघड रस्ता आणि कोणत्याही हवामानात सहजपणे चालते. मुंबई आणि पुणे शहरांमधील ओल्या रस्त्यांवर या बाईकचे टायर्स कसे काम करतील याबाबत शंका येऊ शकते. कारण इंटरनॅशनल स्पीड 400 ला Metzeller M9 RR टायर्स असतात, तर भारतात फक्त एमआरएफ आणि अपोलो टायरचा पर्याय मिळतो आणि पुढचं आणि मागचं चाक एकाच आकाराचं असतं. 8. महाराष्ट्रातील पावसाळ्यात टेस्ट करण्यात आलेल्या बाईकला अपोलो 110/70 आणि 150/60 सेक्शन R 17 टायर होते. ड्युअल-चॅनल एबीएससह सुसज्ज डिस्क ब्रेकच्या जोडीनं या टायर्सनी ओल्या रस्त्यांवर प्रभावी कामगिरी केली. 9. या मोटारसायकलवर सस्पेन्शन ज्या पद्धतीने कॉन्फिगर केले आहे ते देखील अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला येणार्या बहुतेक अडथळ्यांची तीव्रता यामुळे कमी होते आणि तुम्ही आरामात गाडी चालवू शकता. 10. भारतातील स्पीड बाईकचं वजन युरो-स्पेक बाईकपेक्षा सहा किलो जास्त आहे. भारतासाठी स्पीड 400 सेट अतिशय सुबकपणे तयार केला गेला आहे. समोर नंबरप्लेट ब्रॅकेट, भारतीय मानकांसाठी सेट केलेलं सस्पेन्शन ट्युनिंग, इंजिन गार्ड, मागच्या बाजूला ग्रॅब रेल, साडी गार्ड आणि टायर असं हे सेटिंग आहे. 11. ट्रायम्फ स्पीड 400ची 2.33 लाख रुपये किंमत आणि तिची फीचर्स बघता ही गाडी नक्कीच एक चांगली डील ठरू शकते. कारण, याच किमतीत सेम फीचर्स देणारी दुसरी कोणतीही गाडी भारतात सध्या उपलब्ध नाही. विशेष म्हणजे या मोटारसायकलचं आणखी एक व्हर्जन मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 X असं या गाडीचं नाव आहे.