मराठी बातम्या /बातम्या /देश /

पतीने सोडलं, नोकरीही गेली; महिलेने असं केलं ट्रान्सफॉर्मेशन की अमेरिकेपर्यंत झाला गौरव!

पतीने सोडलं, नोकरीही गेली; महिलेने असं केलं ट्रान्सफॉर्मेशन की अमेरिकेपर्यंत झाला गौरव!

कसा होता महिलेचा खडतर प्रवास...

कसा होता महिलेचा खडतर प्रवास...

कसा होता महिलेचा खडतर प्रवास...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं. कधी आनंद तर कधी दु:ख. जे घडतं त्याला सामोरं मात्र जावं लागतं. महिलांना जीवनात अधिक संघर्ष करावा लागतो कारण त्यांना लग्नानंतर (Marriage) कसं कुटुंब मिळेल यावर बराचसा भाग अवलंबून असतो. पण अनेक जणी अशा असतात ज्या आपली स्वप्न काहीही झालं तर पूर्ण करतात आणि असंच एक नाव आहे मिस वर्ल्ड इंटरनॅशनल अ‍ॅम्बॅसेडर 2022 (Ms World International Ambassador 2022) किताब जिंकणाऱ्या प्रिया याचं.

प्रिया यांच्या पतीनी त्यांना सोडलं, त्यात नोकरी गेली आणि डिप्रेशनही (Depression) आलं तरीही त्यांनी संघर्ष करून हा किताब पटकावला. आज तक ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रिया यांचं पूर्ण नाव प्रिया परमिता पॉल (Priya Paramita Paul) असं आहे. सध्या त्या एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आणि लाईफ कोच म्हणून काम करतात. त्या मूळच्या आसामच्या आहेत.

त्या म्हणाल्या,‘ मिस वर्ल्ड इंटरनॅशनल अ‍ॅम्बॅसेडर 2022 (Ms World International Ambassador 2022) या स्पर्धेची अंतिम फेरी अमेरिकेतील फ्लोरिडात मियामी इथं पार पडली. 72 सहभागी महिलांपैकी माझा नंबर 59 होता आणि शेवटी भारताचं आणि माझ्या बॅचचा क्रमांक विजेती म्हणून जाहीर झाला तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. मी भारताकडून हे विजेतेपद पटकावल्याने मी भारावून गेले होते. आता इतर इव्हेंट्स, चॅरिटा कार्यक्रमांतही मला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मी या आधी मिस वर्ल्ड इंटरनॅशनल, मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल, मिस वर्ल्ड पेटिट हे किताबही जिंकले आहेत.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण मी खंबीरपणे उभी राहिले. आपलं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत (Confidence) गोळा करून मी पुन्हा उभी राहिले. सौंदर्यवती स्पर्धा जिंकण्याचं माझं बालपणीचं स्वप्न मी आता पूर्ण केलं आहे. ’

‘माझं 2016 मध्ये लग्न झालं. आमचं कुटुंब चांगलं होतं. पण अचानक माझा नवरा दूर रहायला गेला आणि मला मेल करून त्यानी सांगितलं की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. पण त्याचं दुसऱ्या बाईशी लफडं (Extra Marital Affair) चालू होतं. मी त्याला दोन वर्षं समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यानी दाद दिली नाही. मी दोन वर्षं डिप्रेशनमध्ये होते पण 2018 मध्ये मी घटस्फोट घेतला,’ असंही प्रिया यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, ‘त्याच काळात माझी नोकरी गेली. माझ्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं होतं. सनातनी कुटुंबात लग्न झाल्यामुळे माझी स्वप्न सोडून दिली होती. पण आता या अडचणींत लक्षात आलं की मला पुन्हा उभं रहायला हवं. मग मी निश्चय केला की आपलं लहानपणीचं स्वप्न (Childhood Dream) सत्यात आणायचं. 10-12 किलो वजन कमी केलं त्यामुळे आत्मविश्वास वाढला. नंतर हीलिंग, योग, जिम, पळणं यांच्या मदतीने स्वत: ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम केलं. या स्पर्धेत भाग घेतला आणि आज मी मिस वर्ल्ड इंटरनॅशनल अ‍ॅम्बॅसेडर 2022 (Ms World International Ambassador 2022) किताब जिंकला आहे.’

First published:

Tags: America, Positive story, Weight loss