चखरी दादरी, 31 मार्च : हरियाणातील चखरी दादरी येथे एका वृद्ध जोडप्याने सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी वृद्ध दाम्पत्याने एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. आत्महत्या केलेले दोघेही वृद्ध दाम्पत्य आयएएस विवेक आर्य यांचे आजोबा आणि आजी आहेत. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या मुलाकडे 30 कोटींची संपत्ती आहे, पण आम्हाला ते खायला सुकी आणि शिळी भाकरी देतो. हे कधीपर्यंत आम्ही सहन केलं असतं म्हणून म्हणूनच सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या.
आत्महत्या केल्यानंतर आयएएस विवेक आर्यच्या आजोबांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी सुसाईड नोट मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. मृत जगदीशचंद यांनी एका खासगी रुग्णालयात पोलिसांना एक लेखी पत्र दिले असून, ही सुसाईड नोट देखील मानली जाऊ शकते. जगदीशचंद (78) और भागली देवी (77) अशी मृतांची नावे आहेत. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
जगदीशचंद (78) और भागली देवी (77) हे बाढडा येथील शिव कॉलनीत मुलगा वीरेंद्र यांच्याजवळ राहत होते. वीरेंद्र आर्य यांचा मुलगा विवेक आर्य 2021 मध्ये आयएएस झाला आहे आणि त्याला हरियाणा केडर मिळाले आहे. सध्या ते प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असून त्यांची पोस्टिंग कर्नाल येथे आहे. बुधवारी रात्री जगदीशचंद आर्य आणि त्यांची पत्नी भागली देवी यांनी बाढडा येथील राहत्या घरी विषारी द्रव्य घेतले आणि रात्री उशिरा जगदीशचंद आर्य यांनी विष गिळल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
यानंतर ईआरव्ही 151 घटनास्थळी पोहोचली आणि बाढडा पोलीस ठाण्यातून पोलीस पथकालाही पाचारण करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने वृद्ध दाम्पत्याला प्रथम बधडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले व तेथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. दादरी रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दुसरीकडे, विष प्राशन केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे मृताचा मुलगा वीरेंद्र याने सांगितले. वयाच्या या टप्प्यावर दोघेही आजारपणामुळे त्रस्त होते, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं -
मी जगदीशचंद आर्य तुम्हाला माझे दु:ख सांगत आहे. माझ्या मुलांची बाढडा येथे 30 कोटींची मालमत्ता आहे, पण मला देण्यासाठी त्यांच्याकडे दोन भाकरीही नाहीत. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. 6 वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. काही दिवस पत्नीने त्यांच्या पत्नीने जेवण दिले. पण नंतर ती तिने चुकीचे पाऊल उचलत माझ्या पुतण्याला सोबत घेतले. मी याला विरोध केला असता त्यांना ही गोष्ट आवडली नाही. कारण मी हयात असताना दोघेही चूकीची कामे नाही करू शकत होते. त्यामुळे त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले.
मी दोन वर्षे अनाथाश्रमात राहिलो आणि परत आलो तर त्यांनी घराला कुलूप लावले. या काळात माझ्या पत्नीला अर्धांगवायू झाला आणि आम्ही आमच्या दुसऱ्या मुलासोबत राहू लागलो. आता त्यांनीही ठेवायला नकार दिला आणि मला शिळ्या पिठाच्या भाकरी आणि दोन दिवसाच्या दहीच्या द्यायला सुरुवात केली. हे गोड विष किती दिवस खाणार म्हणून मी सल्फासची गोळी खाल्ली.
माझ्या मृत्यूचे कारण माझ्या दोन सून, एक मुलगा आणि एक पुतण्या आहेत. या चौघांनी माझ्यावर जितके अत्याचार केले तितके अत्याचार कोणत्याही मुलाने आपल्या आई-वडिलांवर करू नयेत. ऐकणाऱ्यांना मी विनंती करतो की, आई-वडिलांवर इतका अन्याय करू नये आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्या बँकेत दोन एफडी आणि बाढडा येथे दुकान आहे, ते आर्य समाज बाढडा यांना द्यावे, असे त्यांनी लिहिले.
डीएसपी मुख्यालय वीरेंद्र शेओरन यांनी सांगितले की, मृत जगदीशचंद यांनी एका खासगी रुग्णालयात पोलिसांना एक लेखी पत्र दिले असून, ही सुसाईड नोट देखील मानली जाऊ शकते. कुटुंबीयांकडून छळ होत असल्याचा आरोप करत मृताने विषारी द्रव्य घेत आत्महत्या केली. तर मृताचा नातू आयएएस अधिकारी असून सध्या प्रशिक्षणार्थी आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या मुला-सुनेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Ias officer