नोएडा, 26 जानेवारी: शेतकरी आंदोलन (Farmers Protest) मागे घेण्याच्या पवित्र्यात शेतकरी अजिबात दिसत नाही आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील शेतकरी रोज नव्या उमेदीने यामध्ये सहभागी होत आहे. दरम्यान आज समोर आलेला एक व्हिडीओ काहीसा विचलित करणारा आहे. नोएडामधील चिल्ला सीमेवर आयोजित ट्रॅक्टर परेडआधी काही शेतकरी ट्रॅक्टरमध्ये बसून स्टंट करत होते, त्यावेळी ट्रॅक्टर पलटल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये एक शेतकरी जखमी झाल्याचे समोर येते आहे.
नोएडा: चिल्ला बॉर्डरवर ट्रॅक्टर परेडआधी काही शेतकरी स्टंट करत होते, त्यावेळी ट्रॅक्टर पलटल्यामुळे एक शेतकरी जखमी pic.twitter.com/9ViCBFsLAo
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2021
दरम्यान कृषी कायद्यांचा विरोध दर्शवण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2021) शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीसाठी सिंघू, टीकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. याठिकाणी सर्वत्र शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पाहायला मिळत आहेत.
#WATCH Farmers climb atop a police water cannon vehicle at Sanjay Gandhi Transport Nagar in Delhi pic.twitter.com/8W0EFjaeTb
— ANI (@ANI) January 26, 2021
दरम्यान केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला. रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडल्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आंदोलन करत आहेत, त्यावेळी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर भागात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
दुसरीकडे दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये शेतकऱ्यांवर फुलं उधळण्यात आली. गाझीपूर बॉर्डरवरून अप्सरा बॉर्डर-हापूर रोड-आयएमएस कॉलेज-लाल कौन-गाझीपूर मार्गे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Protesting farmers