मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुर्मू अन् सिन्हा यांचं भविष्य मतपेटीत बंद! कुठे किती मतदान? एका क्लिकवर सर्वकाही

मुर्मू अन् सिन्हा यांचं भविष्य मतपेटीत बंद! कुठे किती मतदान? एका क्लिकवर सर्वकाही

Rashtrapati election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशातील निवडून आलेल्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींसाठी मतदान केले. यामध्ये 99 टक्के मतदान झाले तर 10 राज्यांमध्ये 100 टक्के मतदान झाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 18 जुलै : देशाच्या 16व्या राष्ट्रपतीसाठी निवडणूक पार पडली आहे. देशभरातून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी संसद भवन आणि राज्य विधानसभेत उभारलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 4,796 मतदारांपैकी 99 टक्के मतदारांनी मतदान केले असून 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये 100 टक्के मतदान झाले आहे. एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, दिल्ली आणि पुद्दुचेरीसह देशभरातील संसद भवन आणि राज्य विधानसभेतील 30 केंद्रांवर निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने यशस्वीपणे पार पडल्या.

राज्याच्या मुख्यालयात 40 खासदारांनी मतदान केले

"मिळलेल्या अहवालानुसार, एकूण 771 संसद सदस्यांनी (05 रिक्त) मतदानाचा हक्क बजावला आणि त्याचप्रमाणे विधानसभेच्या एकूण 4025 सदस्यांनी (06 रिक्त आणि 02 अपात्र) आज 99 टक्क्यांहून अधिक मतदान केले," छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आमदारांनी 100 टक्के मतदान केले, असे निवेदनात म्हटले आहे. 40 खासदारांनी राज्य मुख्यालयात, नऊ खासदारांनी संसद भवनात आणि दोन खासदारांना इतर राज्यांच्या मुख्यालयात मतदान करण्याची परवानगी होती.

9 आमदारांचे संसद भवनात मतदान

राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी म्हणाले की, आज (18 जुलै 2022) सकाळी 10 वाजता संसद भवन येथे आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नियुक्त ठिकाणी सुरू झालेल्या 16 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. राज्यसभा सचिवालयाच्या नवीन विधानानुसार, 736 मतदारांपैकी 728 मतदारांनी मतदान केले, त्यात 719 खासदार आणि 9 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण 98.91% मतदान झालं.

Presidential Election 2022 : मुर्मू की सिन्हा? राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत कोण मारेल बाजी? शिवसेनेच्या भूमिकेने कसं बिघडलं गणित?

द्रौपदी मुर्मूला कोणत्या पक्षांनी पाठिंबा दिला?

महाराष्ट्रातील सत्ता उलथून टाकल्यानंतर यशवंत सिन्हा यांची उमेदवारी थोडीशी कमकुवत झाली आहे. 18 जुलैच्या निवडणुकीसाठी भाजपने मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केले तेव्हा एनडीए बहुमताच्या आकड्यांपासून 13,000 मतांनी कमी होता. त्यानंतर त्यांना बसपा, एसएडी, वायएसआरसीपी, टीडीपी आणि बीजेडीचा पाठिंबा मिळाला. शिवसेनेकडे 10.86 लाख मतांपैकी 25 हजारांहून अधिक मते आहेत.

यशवंत सिन्हा यांचा दावा किती भक्कम?

यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. मात्र, अनेक विरोधी पक्ष त्यांच्या समर्थनात नाहीत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस त्यांच्या समर्थनात आहेत. मात्र, उर्वरित पक्ष काय करणार, याबाबत चित्र स्पष्ट नाही. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही मुर्मू यांना मतदान करणार आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीही यशवंत सिन्हा यांच्या विरोधात मतदान करू शकते.

First published:

Tags: President