Home /News /national /

Toolkit Case: दिशा रवी तिहार जेलच्या बाहेर, कोर्टानं पोलिसांना फटकारलं!

Toolkit Case: दिशा रवी तिहार जेलच्या बाहेर, कोर्टानं पोलिसांना फटकारलं!

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेली पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी (Disha Ravi) हीची मंगळवारी रात्री उशीरा जामिनावर तिहार जेलमधून सुटका करण्यात आली.

    नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी :  देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेली पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी (Disha Ravi) हीची मंगळवारी रात्री उशीरा जामिनावर तिहार जेलमधून सुटका करण्यात आली. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयानं 1 लाख रुपयांच्या बाँडवर दिशाचा सशर्त जामीन मंजूर केला. शेतकरी आंदोलनासंबंधित (Farmer Protest) पर्यावरण कार्यकर्ती  ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) ट्वीट केलेल्या टूलकिटचं (Toolkit case) संपादन केल्याप्रकरणी दिशाला 13 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात सादर केलेले पुरावे त्रोटक आणि अपुरे असल्याचं सांगत कोर्टानं दिशाचा जामीन मंजूर केला होता. कोर्टानं पोलिसांना फटकारलं दिशा रवीला जामिनावर मुक्त करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पोलिसांना चांगलंच फटकारलं. ‘दिशा रवी हिची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नाही. कोणत्याही लोकशाही देशामध्ये नागरिक हे सरकारच्या अंतरात्माचे संरक्षक असतात. केवळ सरकारच्या धोरणांशी असहमती दर्शविल्यानं एखाद्याला तुरुंगात टाकणे चुकीचे आहे, असे न्या. राणा यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने दिशा रवीला जामीन देताना ऋग्वेदाचा देखील उल्लेख केला आहे. यावेळी न्यायाधीश म्हणाले, 'आ नो भद्रः क्रतवो यंतु विश्वतो दब्धसो अपरीतास उद्भिद:' याचा अर्थ असा होतो की, 'आमच्याकडे चहू बाजूंनी असे कल्याणकारी विचार येतात, जे कोणाच्याही दबाबाला बळी पडत नाहीत. तसेच कोणीही बाधित करत नाहीत. त्यामुळे असे अज्ञात विषय प्रकट करणारे विचार येथे येऊ नयेत. ( वाचा : 'स्त्री म्हणजे काही जनावर किंवा निर्जीव वस्तू नव्हे'; आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल ) पुढे न्यायालयानं असंही म्हटलं की, Whatsapp ग्रुप बनवणं, टूलकिट संपादन करणं हा मुळात अपराध नाही. केवळ व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्यामुळे तिचा पोएटिक जस्टीस फाऊंडेशनशी संबंध जोडणं योग्य नाही. तिचा फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा एकही पुरावा आतापर्यंत समोर आला नाही. तसेच 26 जानेवारीला शांतनुने दिल्लीत येणं, हा काही गुन्हा होऊ शकत नाही. टूलकिट आणि 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार याचा संबंध स्पष्ट करणारा काही पुरावा आहे का? अशी विचारणाही न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडे केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi Police, Dharmendra rana, Disha ravi, Farmer protest, Greta Thunberg, India

    पुढील बातम्या