मराठी बातम्या /बातम्या /देश /

टूलकिट प्रकरण : गुप्त Whatsapp chat आलं समोर, दिशानं ग्रेटाला कळवली होती ही गोष्ट

टूलकिट प्रकरण : गुप्त Whatsapp chat आलं समोर, दिशानं ग्रेटाला कळवली होती ही गोष्ट

दिशा आणि ग्रेटा यांच्यामध्ये झालेलं व्हॉट्सप चॅट समोर आलं आहे. याआधारे आता टुलकिट प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

दिशा आणि ग्रेटा यांच्यामध्ये झालेलं व्हॉट्सप चॅट समोर आलं आहे. याआधारे आता टुलकिट प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

दिशा आणि ग्रेटा यांच्यामध्ये झालेलं व्हॉट्सप चॅट समोर आलं आहे. याआधारे आता टुलकिट प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात (Greta Thunberg toolkit case) दिल्ली पोलिसांनी (Delhi police) मंगळवारी अजून एक खुलासा केला. दिल्ली पोलिसांनी सांगितलं, की ग्रेटानं जेव्हा शेतकरी आंदोलनाबाबतची टूलकिट ट्विट केली (Greta tweeted toolkit of farmer protest), त्याच्यानतर लगोलग दिशानं तिला Whatsapp मेसेज केला होता.

यात दिशा ग्रेटाला म्हणाली होती, की या टूलकिटला ट्विट करू नकोस कारण यात सगळ्यांची नावं आहेत. सोबतच दिल्लीच्या एका कोर्टानं दिशा रवी हिला गरम कपडे, मास्क आणि पुस्तकं सोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे. शिवाय दिशाला आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संवादाचीही परवानगी दिली आहे. तिला एफआयआरची प्रत आणि कारवाईबाबतची दुसरी कागदपत्रंही मिळवता येतील.

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं (Aurangabad bench of Bombay High court) शांतनूला 10 दिवसांची अटकपूर्व जामीन दिला आहे. निकिता जेकबच्या (Nikita Jacob) जामीन अर्जावरही मंगळवारी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) सुनावणी झाली. कोर्टानं निर्णय बुधवारसाठी राखून ठेवला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिशानं बनवलेल्या एका व्हॉट्सऍप  ग्रुपचीही (whats app group) माहिती मागवली आहे.  सूत्रांच्या सांगण्यानुसार, इंटरनॅशनल फार्मर स्ट्राईक (International farmer strike) नावाचा हा ग्रुप शेतकरी आंदोलनांच्या समन्वयासाठी तयार केला होता. पोलिसांनी सांगितलं, की हा ग्रुप 6 डिसेम्बरला बनवण्यात आला होता. यात 10 सदस्य होते. नंतर दिशानं आपल्या फोनमधून सगळे नंबर डिलीट केले. भास्करने याविषयी वृत्त दिलं आहे.

हेही वाचाToolkit Case: दिशा रविच्या अटकेप्रकरणी दिल्ली पोलिसांना महिला आयोगाची नोटीस

ग्रेटा आणि दिशामध्ये झालेलं व्हॉट्सऍप चॅट (whats app chat between Disha and Greta)

ग्रेटा : हे आता तयार असतं तर खूप चांगलं झालं असतं. मला याबाबत खूप धमक्या मिळाल्या असत्या. यातून तर मोठीच डोकेदुखी झाली आहे.

दिशा : शीट... शीट

दिशा : मी हे तुला पाठवते आहे.

दिशा : ओके, असं होऊ शकतं का, की हे टूलकिट तू शेअर करू नयेस? असं होऊ शकणार नाही का, की काही काळ आपण कुणीही काहीच बोलणार नाही? मी वकिलांशी बोलणार आहे. मी माफी मागते पण यात आम्हा लोकांची नावं आहेत. आम्हा लोकांविरुद्ध Unlawful activities prevention act (UAPA) अंतर्गत केस होईल.

दिशा : तू बरी आहेस ना?

ग्रेटा : मी काहीतरी लिहिलं पाहिजे.

दिशा : तू मला 5 मिनिट देऊ शकशील का? मी वकिलांशी बोलते आहे.

ग्रेटा : कधीकधी अशी द्वेषाची वादळं उभी राहतात आणि ती खरोखर भयानक असतात.

दिशा : मी तुझी माफी मागते. आम्ही सगळे अस्वस्थ आहोत कारण इथं परिस्थिती खूपच खराब होते आहे.

दिशा : आम्ही याची खात्री करू की या प्रकरणात तुझं नाव येणार नाही.

दिशा : आता आम्ही सगळी सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले पाहिजेत.

टूलकिट केसमध्ये मुंबईची वकील आणि कार्यकर्ती निकिता जेकब हिच्याविरुद्धही अजामीनपात्र वॉरंट काढला गेला आहे. यानंतर निकितानं 26 जानेवारीआधी झालेल्या त्या व्हर्चुअल मीटिंगमध्ये उपस्थित असल्याचं कबूल केलं. यात पोएटिक जस्टीस फाउंडेशनचे एमओ धालीवाल, दिशा आणि इतर लोक झूम ऍपच्या माध्यमातून जोडले गेले होते. ही मिटिंग 11 जानेवारीला झाली होती.

यात 70 लोक सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी झूम ऍपला ही सगळी माहिती मागितली आहे. यातच ग्लोबल फार्मर स्ट्राईक आणि ग्लोबल डे ऑफ ऍक्शन 26 जानेवारी नावानं टूलकिट बनवण्याचा निर्णय झाला होता.

टूलकिटबाबत निकिताचे दोन युक्तिवाद

१. निकिताच्या वकिलानं याबाबत मुंबई पोलिसांसमोर काही कागदपत्रं सादर केली आहेत. यात निकिता म्हणते, 'टूलकिट एक्स्टिन्शन रिबेलियन NGO (XR)च्या भारतीय स्वयंसेवकांनी बनवली होती. याचा हेतू आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या शेतकरी आंदोलनाचं चित्र एका जागी सादर करणं हा होता.

२. निकिता म्हणाली, 'स्वीडनच्या क्लायमेट ऍक्टिविस्ट ग्रेटा थानबर्गसोबत मी कुठलीच माहिती शेअर केली नाही. हे टूलकिट डॉक्युमेंट एक इन्फर्मेशनल पॅकशिवाय काहीच नाही. आणि यामागचा हेतू हिंसा भडकावणं हा नव्हता. यामागं कुठला राजकीय, धार्मिक वा आर्थिक अजेंडाही नाही.

हे प्रकरण देशातल्या शेतकऱ्यांशी संबंधित आहे. 3 फेब्रुवारीला 18 वर्षांची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं टूलकिट शेअर केलं होतं. हे टूलकीट खरंतर एक गूगल डॉक्युमेंट होतं. यात 'अर्जंट, प्रायर आणि ग्राउंड ऍक्शन्स'बाबत लिहिलेलं होतं.

याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी 14 फेब्रुवारीला दिशा रवी हिला अटक केली. २२ वर्षांची दिशा बीबीएची विद्यार्थिनी आहे. तिनं 2019 मध्ये फ्रायडे फॉर फ्युचर इंडियाच्या विंगची सुरवात केली होती. या आंतरराष्ट्रीय ग्रुपची संस्थापक ग्रेटा थनबर्ग आहे. शेतकरी नेत्यांनी दिशाला सोडावं अशी मागणी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अटकेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दिल्ली पोलिसांच्या आयुक्तांनी म्हटलं, की ही अटक कायदेशीरच आहे. कायदा वयानुसार भेदभाव करत नाही. दिशाला कोर्टापुढे आणलं गेलं. कोर्टानं दिशाला 5 दिवसाची पोलीस कस्टडी सांगितली आहे.

First published:

Tags: Farmer protest, Greta Thunberg, Whatsapp chat