मुंबई : टोमॅटोंचे दर 100-120 रुपये प्रति किलो झाले आहेत. यामुळे अनेकांचं आर्थिक नियोजन बिघडलंय. पण काही दिवसांपूर्वी भाव न मिळणाऱ्या टोमॅटोचे दर अचानक इतके का वाढले हा मोठा प्रश्न आहे. दरवर्षी देशात टोमॅटो क्रायसिस का येतो? यामागची नेमकी काय कारणं असू शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. गेल्या वर्षी भारतातून 89 हजार मेट्रिक टन टोमॅटोची निर्यात टोमॅटोच्या उत्पादनात चीननंतर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत दरवर्षी सुमारे दोन कोटी टन टोमॅटोचं पीक घेतो. गेल्या वर्षी भारतातून 89 हजार मेट्रिक टन टोमॅटोची निर्यातही झाल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे भारतात उत्पादन कमी नाही, हे स्पष्ट होतंय. लोक भाजीपाला विक्रेत्यांवर चिडतात टोमॅटोचे दर वाढल्याने लोकांचं आर्थिक गणितही बिघडलं आहे. त्यामुळे ते बऱ्याचदा भाजीपाला विक्रेत्यांवर चिडतात, काही तर शिव्याही देतात. एक ग्राहक म्हणाला की किलोभर टोमॅटो घ्यायचे होते, पण भाव ऐकून फक्त पावभर घेतले आहेत.
वर्षातून फक्त 4 महिने तयार होते ही खास मिठाई, ‘या’ भाजीपासून होते तयार PHOTOSटोमॅटोचं पीक किती दिवसांत केव्हा होतं? भारतात टोमॅटोचं सर्वाधिक पीक मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात घेतलं जातं. भारतात टोमॅटोची प्रामुख्याने दोन पिकं घेतली जातात. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत एका पिकाची पेरणी होते. दुसरं पीक फेब्रुवारी ते जुलैदरम्यान घेतलं जातं. फेब्रुवारीच्या पिकाला एप्रिलपर्यंत फुलं येतात आणि टोमॅटो जून-जुलैमध्ये तयार होतात. आता फेब्रुवारीचं पीक बाजारात आहे. टोमॅटोचे भाव का वाढले? व्यापारी काय म्हणतात? हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमधील पीक खराब झाल्याने टोमॅटो महागल्याचं दिल्लीतील व्यापारी सांगतात. सध्या दिल्लीची बाजारपेठ हिमाचलच्या टोमॅटोवर अवलंबून आहे, जिथे 30 टक्के उत्पादन कमी झालंय, त्यामुळेच दर वाढले आहेत. स्थानिक टोमॅटो कुजल्याने हे देशी टोमॅटो बेंगळुरूहून येत असल्याने महागल्याचं लखनऊचे दुकानदार म्हणतात. दुसरीकडे, जयपूरमध्ये वादळामुळे टोमॅटो कुजले आहेत, तिथंही बेंगळुरूहून टोमॅटो येतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने टोमॅटोचे दर वाढल्याचं दुकानदार म्हणाले.
बाबो! किंमत वाचूनच चक्कर येईल; सोन्याच्या भावाने विकले जात आहेत बटाटे; कारण…अहमदाबादचे व्यापारी सांगतात की स्थानिक टोमॅटोची आवक बंद आहे आणि बेंगळुरूहून कमी माल येतोय, जो येतोय तो नाशिकहून येतोय त्यामुळे तुटवडा आहे. मागणी जास्त, आवक कमी आहे. इंदूरच्या व्यावसायिकाने सांगितलं की, स्थानिक टोमॅटो संपला आहे, महाराष्ट्रातून फक्त 20 टक्के माल येत आहे. पाऊस आणि उन्हामुळे भाव वाढत असल्याचं चंडीगडच्या व्यापाऱ्याने सांगितलं. काही ठिकाणी काळाबाजार तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांची मनमानी असल्याने पाटण्यात टोमॅटोचे दर वाढलेत. 2022 च्या जून महिन्यात टोमॅटोचे दर 60-70 रुपये किलो होते, 2021 मध्ये 100 रुपये तर 2020 मध्ये 70-80 रुपये प्रति किलो होते. 100 रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊन आपण टोमॅटो खरेदी करतो, तो पैसा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का?
टोमॅटोच्या वाढत्या किमतींबाबत कृषीतज्ज्ञ देविंदर शर्मा म्हणाले की, त्याचा फायदा शेतकरी किंवा ग्राहकाला होत नाही. यामागे रिटेल माफिया आहेत आणि ते हवामानाचं कारण पुढे करून भाव कंट्रोल करतात. शेतकरी आजही पूर्वीच्याच स्थितीत आहे. त्यामुळे सरकारला व्यापारी माफियांवर नियंत्रण ठेवावं लागेल. शेतमालाला ग्राहक किमतीच्या निम्मी रक्कम मिळाली तर बरं होईल. टोमॅटो रस्त्यावर का फेकले जात होते? तीन आठवड्यांपूर्वी टोमॅटोला दोन रुपये भाव मिळत होता. आता ते 80-100 रुपये किलो झालेत. त्यामागे दोन कारणं आहेत. 1. वातावरणामुळे लोकल डिस्टर्बन्स 2. दरातील तफावत - देशभरात टोमॅटोच्या दरांत तफावत असते. रिटेल किंमत 60 रुपये किलोपेक्षा जास्त आहे; पण बाजारात ते 80 व 100 रुपये किलो होतात. हॉकर टोमॅटोचे दर ठरवतात, त्यामुळे महागाई वाढते. टोमॅटोच्या वाढत्या दराबद्दलची काही तथ्यं 1 - आधी कडक ऊन आणि नंतर पावसाने टोमॅटो पिकाचं नुकसान झालं हे खरंय. 2 - पण सामान्य लोक महाग टोमॅटो विकत घेत असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी उचलत आहेत. 3 - गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात टोमॅटोचे दर 100 रुपये किलो होतात. 4 - टोमॅटोची दरवाढ रोखण्यासाठी कोणत्याही उपायांवर विचार केला गेला नाही. 5 - देशात भाज्या प्रोसेस करून पुढच्या ऋतुसाठी साठवण्यासाठी काही व्यवस्था नाही. 6 - भारतात फक्त 10 टक्के कृषी उत्पादनं सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. 7 - 2020-21 च्या एका रिपोर्टनुसार देशातील एकूण फळांच्या फक्त 4.5 टक्के व फक्त 2.70 टक्के भाज्या प्रोसेस करून कठीण काळासाठी ठेवण्याची सोय आपल्या देशात आहे. टोमॅटोचे वाढते दर रोखण्याचे उपाय पहिला उपाय - पावसाळ्यापूर्वी टोमॅटोचं पीक घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. दुसरा उपाय - उन्हाळ्यात टोमॅटो स्वस्त आणि वाहतूक सुलभ असते, तेव्हाच प्रत्येक जिल्ह्यात टोमॅटोवर प्रक्रिया करून प्युरी बनवणं आणि बाटल्यांमध्ये ठेवण्यावर भर द्यावा. टोमॅटो प्रोसेस करून ठेवल्यास शेतकऱ्यांना रास्त भावही मिळेल व टोमॅटो वाया जाणार नाहीत. तसंच पावसाळ्यात इतके भाव वाढणार नाहीत. या साठी देशातील कृषी पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवर विकसित करण्यावर भर देणं आवश्यक आहे, जेणेकरून फळं आणि भाजीपाला प्रक्रिया करून शक्य तितक्या प्रमाणात ठेवता येईल. दरवाढीचा फटकाही बसणार नाही.