आंध्रप्रदेश, 7 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दारूवर 100 टक्के सेस लावण्यात येण्याचीही घोषणा केली. यामुळे दारूच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे. दारूच्या किंमती जवळपास दुप्पट होण्याचं सांगण्यात आलं आहे.
व्हिस्की, स्कॉच, बरबन, ब्रँडी अशा सर्व प्रकारच्या विदेशी दारूवर किंवा अल्कोहोलिक पेयांवर (Alcoholic beverages) 100 टक्के कृषी अधिभार लावण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे दारूच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढणार असून याचा मद्यप्रेमींना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.
दारूच्या किंमती वाढल्याने अशाच एका मद्यप्रेमीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दारूच्या किंमती कमी करण्यासाठी त्याने एका वेगळ्याच प्रकारचं आंदोलन सुरू केलं असून त्याच्या या आंदोलनाचा व्हिडीओ समोर आला आहे.
आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील पोलीस स्टेशनसमोरच हा व्यक्ती ठाण मांडून बसला आहे. रस्त्यावर बसून त्याने आपलं आंदोलन सुरू केलं आहे. व्हिडीओत हा व्यक्ती पोलीस स्टेशनसमोरच रस्त्यावर बसलेला दिसत असून त्याच्या आजूबाजून अनेक गाड्या जात असल्याचंही दिसतंय. रस्त्यावर बसून तो दारूच्या वाढवलेल्या किंमती कमी करण्याची मागणी करत आहे.
Unique protest in front of #Kuppam police station #Chittoor #AndhraPradesh. The guy sitting on roads protest is demanding reduction in liquor prices as it is making big dent in its pocket. @sanjeevrsingh @pankajjha_ pic.twitter.com/nXhcwsQ2ng
— dinesh akula (@dineshakula) February 7, 2021
दारूच्या वाढत्या किंमतीमुळे दररोजच्या खर्चावर, त्याच्या खिशावर मोठा परिणाम होत असल्याचं सांगत त्याने किंमती कमी करण्याचा सूर आळवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh