जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! कंप्रेशरने हवा भरत असताना अचानक फुटला टायर; अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू

धक्कादायक! कंप्रेशरने हवा भरत असताना अचानक फुटला टायर; अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू

धक्कादायक! कंप्रेशरने हवा भरत असताना अचानक फुटला टायर; अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू

टायरमध्ये हवा भरताना अचानक टायर फुटला आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 20 नोव्हेंबर : कंप्रेशरच्या माध्यमातून टायरमध्ये हवा भरताना टायर फुटून (Tires burst) एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भमोरी येथे रात्री एक तरुण  कंप्रेशरने टायरमध्ये हवा भरत असताना टायर फुटला. ज्यामुळे एका तरुणाच्या छातीला जखमी झाली. त्यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. विजय नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी रात्री 9 वाजता घडली आहे. या अपघातात घाटी खालिया (बड़वानी) मध्ये राहणारा 48 वर्षीय मलखान  सिंह यांचा मृत्यू झाला. लोकांनी सांगितलं की, ते एका टायरच्या दुकानात काम करीत होते. रात्री 9 वाजता ते कारच्या टायरमध्ये कंप्रेशरने हवा भरत होते. यादरम्यान अचानक टायर फुटला. ज्यामुळे मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमध्ये मलखान सिंह यांच्या छातीला जखम झाली. त्या ब्लास्टनंतर ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हे ही वाचा- शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत love..Sex..धोका; कोल्डड्रिंकमध्ये नशेचं औषध देऊन… यावेळी घटनास्थळी हजर असलेल्यांनी सांगितलं की, टायरमध्ये जास्त हवा भरली गेली होती. ज्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. कंप्रेशरमधून सातत्याने येणाऱ्या हवेच्या दबावामुळे टायर फुटल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी कंप्रेशन आणि टायरचा तपास करण्यासाठी विशेषज्ञांशी चर्चा केली. यावेळी टायर फुटण्यामागील नेमके काय कारण आहे याचाही तपास करण्यात येईल.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात