जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत love..Sex आणि धोका; कोल्डड्रिंकमध्ये नशेचं औषध देऊन केलं...

शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत love..Sex आणि धोका; कोल्डड्रिंकमध्ये नशेचं औषध देऊन केलं...

शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत love..Sex आणि धोका; कोल्डड्रिंकमध्ये नशेचं औषध देऊन केलं...

या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

हरिद्वार, 19 नोव्हेंबर : हरिद्वारमधील एका भागात खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना लग्नाचं अमिष दाखवून दुष्कर्म केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीची चौकशी केली जात आहे. बलात्काराचा आरोप असलेला तरुण हिमाचल प्रदेशातील ऊर्जा विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून तैनात आहे. मुख्याध्यापक महिलेचा आरोप आहे की, लग्नाची बतावणी करुन तरूण गेल्या 3 वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करीत आहे. आता नोकरी मिळाल्यानंतर तो लग्न करण्यास नकार देत आहे. एवढेच नव्हे तर आरोपी मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही देत होता. पीडितेच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स ठाण्यातील पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार पीडितेने सांगितले की सुमारे 3 वर्षांपूर्वी ती रुड़की या भागातील एका कोचिंग सेंटरमध्ये सरकारी नोकरीची तयारी करत होती. याच दरम्यान त्याच कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या अमजदशी ओळख झाली. त्यांच्यातील मैत्री हळू हळू प्रेमात बदलली. या युवकाने मुलीला आपल्या कुटुंबाशीही ओळख करून दिली आणि लग्न करण्याचं वचन दिलं. अमजदने एकेदिवशी तिला काहीतरी कारण सांगून कोचिंग सेंटरमध्ये बोलावलं आणि तेथेच तिच्यावर बलात्कार केला, असा महिलेचा आरोप आहे. हे ही वाचा- 22 वर्षांच्या पाकिस्तानी तरुणाला आहेत 3 बायका; नवऱ्यासाठी शोधताहेत चौथी बायको काही काळानंतर अमजद ऊर्जा विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाला आणि तरुणीही एका खासगी शाळेत मुख्याध्यापक () म्हणून काम करू लागली. यानंतरही आरोपीने अनेकदा तरुणीला अनेक ठिकाणी नेऊन तिला कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचं औषधं देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी महिलेचा असा आरोप आहे की, जेव्हा तिने अमजदवर लग्नासाठी दबाव आणला तेव्हा त्याने तिच्यासोबतचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमजद अली याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश शहा यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात