Home /News /national /

असं ठिकाण जिथून जिवंत माघारी येणं कठीण, आतापर्यंत 3 हजार जणांनी गमावला जीव

असं ठिकाण जिथून जिवंत माघारी येणं कठीण, आतापर्यंत 3 हजार जणांनी गमावला जीव

मोठ्या शहरांमध्ये लहान मोठं काम करणारे लोक आता गावी परतले आहे. मजुरी करुन या लोकांना176 रुपयांपर्यंत पैसे मिळतात. मात्र, जंगलात काम केल्यास त्यांना एकाच दिवसात 700 रुपयेही मिळतात.

    नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : पश्चिम बंगालमध्ये  (West Bengal) एक असं ठिकाण आहे, जिथे गेलेल्या 3 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा भाग सुंदरबनाजवळील दक्षिण 24 परगना (South 24 Pargana) येथील आहे. सुंदरवनात (Sundarban) मोठ्या संख्येनं वाघ राहातात. मात्र, या भागात मासे, खेकडे आणि मध मिळवण्यासाठी आसपासच्या परिसरातील लोक जात असतात. यातील बहुतेक जणांवर वाघ हल्ला करतात आणि यातच त्यांचा मृत्यू होतो. मीडिया रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, दक्षिणबांगा मत्स्यजीवी फोरमचे अध्यक्ष प्रदीप चॅटर्जी यांनी सांगितलं, की आतापर्यंत जवळपास 3000 महिलांच्या नवऱ्यांना वाघांनी मारलं आहे. गाववाल्यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास 60 लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. गाववाल्यांचं असं म्हणणं आहे, की मोठ्या शहरांमध्ये लहान मोठं काम करणारे लोक आता गावी परतले आहे. मजुरी करुन या लोकांना176 रुपयांपर्यंत पैसे मिळतात. मात्र, जंगलात काम केल्यास त्यांना एकाच दिवसात 700 रुपयेही मिळतात. याच कारणामुळे इथले लोक स्वतःचा जीव धोक्यात टाकून जंगलात जातात. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात जवळपास 60 हजार लोकं काम करतात. या जंगलात राहाणाऱ्या वाघांची संख्या मोठी आहे. तर, सुंदरबन टायगर रिजर्वचे फील्ड डायरेक्टर तपस दास यांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात केवळ 21 मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. यातील केवळ 4 लोकांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे. कारण, सरकार प्रतिबंधित क्षेत्रातच्या बाहेर झालेल्या मृत्यूंसाठीच पैसे देतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Person death, Tiger attack

    पुढील बातम्या