नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. पण हे वाक्य बस्ती येथील आर्यन नावाच्या चिमुकल्यानं खरं करून दाखवलं. अवघ्या दोन वर्ष आणि सात महिन्यांच्या या मुलानं एवढ्या कमी वयात एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स स्वतःच्या नावावर केली आहेत. मूळचा बस्ती जिल्ह्यातील पुराना डाकखाना परिसरातील रहिवासी असलेला आर्यन सध्या त्याच्या आई-वडिलांसोबत गुजरातमधील भरूचमध्ये राहतो. या चिमुकल्याच्या यशाचं त्याच्या कुटुंबासह संपूर्ण परिसराला कौतुक आहे.
असं केलं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड
आर्यनचे आजोबा नरेंद्र बहादूर उपाध्याय यांनी सांगितलं की, ‘जेव्हा आर्यन फक्त 1 वर्ष 7 महिने 22 दिवसांचा होता, तेव्हा त्यानं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. एवढ्या लहान वयात त्याने सर्व रंग ओळखण्याचं, आणि रंगांची नावं सांगण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं.
हेही वाचा - प्यार वाली लव्हस्टोरी ! 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम
दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड
आर्यन जेव्हा 2 वर्षे 5 महिने आणि 24 दिवसांचा होता, तेव्हा त्याने 250 पेक्षा जास्त शब्दांचे विरुद्धार्थी शब्द अचूक सांगून वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. हे त्याचं दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड ठरलं.
नुकतंच केलं तिसरं वर्ल्ड रेकॉर्ड
आर्यननं नुकतंच तिसरं वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. हे रेकॉर्ड झालं, तेव्हा त्याचं वय हे अवघं 2 वर्षे 7 महिने होतं. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून त्याला ‘मॅक्झिमम पीपल पार्टिसिपेटिंग इन स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीज (मल्टीपल व्हेन्यूज)’ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र आणि मेडल मिळालं. या विक्रमात त्यानं योग प्रकारात सहभाग घेतला होता. त्याने व्हाईट हाउससाठी अनेकदा परफॉर्मन्स केलेले न्यूयॉर्कचे योग प्रशिक्षक बारी कोरल यांना फॉलो करून ए टू झेड आणि 1 ते 20 योग नाविन्यपूर्ण पद्धतीनं केले होते.
कुटुंबात आनंदाची लाट
नातवाच्या यशाबाबत आर्यनचे आजोबा नरेंद्र बहादूर उपाध्याय म्हणाले की, ‘माझ्या नातवाच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाट आहे. आमच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झालाय. माझा नातू पुढे जाऊन आणखी वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करेल, असा विश्वास आहे. कुटुंबाचं, जिल्ह्याचं आणि देशाचं नाव तो मोठं करेल.’
दरम्यान, आजकाल अनेक लहान मुलं ही मोबाईलच्या आहारी जातात. पालकांकडून तशी तक्रार केली जाते. मात्र, वयाची तीन वर्ष पूर्ण करण्यापूर्वीच आर्यन याने तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स स्वतःच्या नावावर नोंदवली आहेत. त्यामुळे त्याचं कौतुक सर्वत्र होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Viral, World record