मराठी बातम्या /बातम्या /love-story /प्यार वाली लव्हस्टोरी ! 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम

प्यार वाली लव्हस्टोरी ! 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम

लव्हस्टोरी

लव्हस्टोरी

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मात्र अशा काही घटना समोर येतात की खरंच प्रेम आंधळं असतं असा विचार येतो. अनेक विचित्र आणि हटके प्रेमप्रकरणं समोर येत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मात्र अशा काही घटना समोर येतात की खरंच प्रेम आंधळं असतं असा विचार येतो. अनेक विचित्र आणि हटके प्रेमप्रकरणं समोर येत असतात. प्रेमात रंग, वय, जात, उंची, असं काही पाहिलं जात नाही असं म्हणतात. आणि अशी अनेक प्रेमप्रकरणंही समोर आली आहेत. अशातच यामध्ये आणखी एक भर पडली असून या हटके लवस्टोरीची चांगलीच चर्चा होतेय.

सध्या चर्चेत आलेली लव्हस्टोरी आहे ज्यांच्यामध्ये 29 वर्षांचा फरक आहे. इंग्लंडमधील रहिवासी ल्यूक एलियास आणि स्टीफ व्हाईट यांची सहा महिन्यांपूर्वी भेट झाली होती. आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे. ल्यूक आणि स्टेफने गेल्या वर्षी जूनमध्ये फेसबुकवर चॅटिंग सुरू केले. दोन दिवसांनी दोघे भेटले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि वयात 29 वर्षांचा फरक असूनही त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 24 वर्षाचा ल्यूक म्हणतो की, त्याला 54 वर्षीय स्टीफवर क्रश होता. तो म्हटला तिचं व्यक्तिमत्त्व खूप गोड आहे.

हेही वाचा - विद्यार्थी असावा तर असा! शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...होतोय कौतुकाचा वर्षाव

स्टेफ चार मुलांची आई आहे. ती म्हणते की, जेव्हा ती ल्यूकसोबत पहिल्या डेटला गेली होती तेव्हा तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. तिला लॉटरी जिंकल्यासारखे वाटले. ड्रायव्हर म्हणून काम करणारा ल्यूक म्हणतो त्याला कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मात्र बाकीचे लोक त्याच्याकडे तिरकस नजरेने बघतात. ल्यूक आणि स्टेफ दोघेही त्यांच्यावर कमेंट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. दोघांचे फोटो पाहिल्यावर सगळे त्यांना आई आणि मुलगा असल्याचं म्हणतात.

दरम्यान, अशा अनेक प्रकारच्या हटके लवस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रेमात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना बाजूला सारुन अनेकजण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. अशा वेगळ्या आणि हटके लव्हस्टोरींची सोशल मीडियावर चर्चा पहायला मिळते.

First published:

Tags: Love, Love story, Social media viral, Top trending, Viral, Viral news