मराठी बातम्या /बातम्या /देश /

पुलवामातल्या त्रालमध्ये भारतीय जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामातल्या त्रालमध्ये भारतीय जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Tral Encounter: त्राल (Tral) मध्ये शनिवारी भारतीय जवानांनी (Security forces ) तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे (JeM)तीन दहशतवादी (terrorist)ठार झालेत.

  श्रीनगर, 21 ऑगस्ट: जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir ) पुलवामा (Pulwama Encounter)जिल्ह्यातील त्राल (Tral) मध्ये शनिवारी भारतीय जवानांनी (Security forces ) तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे (JeM)तीन दहशतवादी (terrorist)ठार झालेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यानं दक्षिण काश्मीर (South Kashmir District) जिल्ह्यातील त्रालमधल्या जंगलाच्या उंच भागात घेराव घालून सर्च ऑपरेशन Search operation)राबवलं. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. ज्यानंतर दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चकमक सुरू असून परिसरात अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. VIDEO:आमिर खानच्या भावावर वेळ आली रस्त्यावर वडापाव खाण्याची, फॅन्स म्हणतात... शुक्रवारी पंपोरमध्ये दोन दहशतवादी ठार शुक्रवारी अवंतीपोराच्या (Awantipora) पंपोर (Pampore ) भागात आज भारतीय सैन्य (Security forces ) आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorist)चकमक झाली. बराच तास चाललेल्या चकमकीनंतर (encounter) भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या (Hizb-ul-Mujahideen) हिट स्क्वॉयडचा एक भाग होते. तसंच त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांची हत्या ही केली होती. दहशतवाद्यांकडून एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले. ठार झालेल्या एक दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक असल्याचं सांगितलं जात आहे. काश्मीरच्या IGP विजय कुमार यांनी सांगितलं की, मुसाएब हा खिरयूचा रहिवासी आहे. त्यानं 23 जुलैला सरकारी शाळेतील एका शिपायाची हत्या केली होती.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Pulwama aatack, Terrorists

  पुढील बातम्या