
राजधानी दिल्ली सध्या high alert वर आहे. दहशतवादी संघटना देशात हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.

दिल्लीचे DCP दीपक यादव यांनी याविषयी बोलताना सांगितलं की आम्हाला सुरक्षा यंत्रणांकडून आतंकवादी हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं आम्ही शहरात ठिकठिकाणी चेकिंग सुरू केली आहे.

सध्या देशात सणासुदीचा काळ सुरू असून त्या काळातच काही तरी घातपात घडवण्याची तयारी काही अतिरेकी संघटनांची आहे. त्यामुळं आता दिल्ली पोलिसांनी याची खबरदारी घेतली आहे. त्यांनी चेक पॉइंट बनवून गाड्यांची तपासणी सुरू केली आहे.

दिल्लीतील काही प्रसिद्ध बाजारांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसवरही पोलीस नजर ठेऊन आहेत. त्याचबरोबर शहरात भाड्याने राहणाऱ्या लोकांचं व्हेरिफिकेशन केलं जात आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित एका अतिरेकी मॉड्यूलचा भांडाफोड केला होता आणि सात आरोपींना अटकही केली होती. हे सर्व जण दिल्लीत सणासुदीच्या काळात अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी एका अतिरेक्याला AK-47 आणि इतर साहित्यांसह अटक केली होती.




