मराठी बातम्या /बातम्या /देश /'एका Vote ची किंमत तुम्हाला काय माहीत?' त्या 7 घटना, ज्यात एका मतामुळे पलटलं पारडं

'एका Vote ची किंमत तुम्हाला काय माहीत?' त्या 7 घटना, ज्यात एका मतामुळे पलटलं पारडं

 खरं तर एका मताने संपूर्ण सरकार पडू शकतं, एवढी तुमच्या-माझ्या एका मताची ताकद आहे.

खरं तर एका मताने संपूर्ण सरकार पडू शकतं, एवढी तुमच्या-माझ्या एका मताची ताकद आहे.

खरं तर एका मताने संपूर्ण सरकार पडू शकतं, एवढी तुमच्या-माझ्या एका मताची ताकद आहे.

  नवी दिल्ली, 4 एप्रिल : सध्या पश्चिम बंगाल, तमिऴनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीत विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2021) होत आहे. अशावेळी अनेकजण आवर्जून मतदान करतात. तर काही जणं, माझ्या एका मताने काय फरक पडणार असा सवाल करतात. पण खरं तर एका मताने संपूर्ण सरकार पडू शकतं, एवढी तुमच्या-माझ्या एका मताची ताकद आहे. त्यामुळेच आज तुम्हाला सांगणार आहोत असा प्रसंग ज्यामध्ये एका मताने संपूर्ण पारडंच फिरवलं. (How One Vote Makes the Difference)

  वाजपेयी सरकार पडलं होतं

  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच सरकार 1999 मध्ये सत्तेत होतं. अनेक पक्षांच्या पाठिंब्याने हे सरकार उभं होतं. एआयएडीएमकेने पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकारला संसदेत अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी झालेल्या मतदानात सरकारच्या बाजूने 269 मतं पडली तर विरोधात 270 मतं. त्यामुळे एका मताने अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं.

  हे ही वाचा-तामिळनाडूत भाजपाची फजिती! प्रचारात वापरला काँग्रेस नेत्याच्या सुनेचा फोटो

  काँग्रेसच्या नेत्याच्या कुटुंबीयांनी दिलं नाही मत

  राजस्थान विधानसभा निवडणूक 2008 च्या वेळी काँग्रेसचे सी. पी. जोशी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. त्या निवडणुकीत जोशींना 62 हजार 215 तर कल्याणसिंह यांना 62 हजार 216 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. महत्त्वाचं म्हणजे जोशींची आई, पत्नी आणि ड्रायव्हर यांनी त्यावेळी मतदानच केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला.

  दक्षिण भारतात कृष्णमूर्ती यांचाही झाला होता पराभव

  2004 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे एआर कृष्णमूर्ति यांना 40,751 तर कांग्रेसचे आर. ध्रुवनारायण यांना 40,752 मतं मिळाली होती. त्यावेळीही कृष्णमूर्तींच्या ड्रायव्हरने मतदान केलं नव्हतं.

  महाभियोगापासून वाचले अमेरिकी अध्यक्ष

  अमेरिकेचे 17वे अध्यक्ष एंड्रूयू जॉन्सन केवळ एका मतामुळे महाभियोगापासून वाचले होते. मार्च 1868 मध्ये ऑफिस कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल जॉन्सन यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई झाली होती. पण महाभियोग सिद्ध करण्यासाठी झालेल्या मतदानावेळी एका मताने ते वाचले. पुन्हा मे महिन्यात त्यांच्याविरुद्ध महाभियोगासाठी मतदान झालं होतं पण त्यातूनही ते बचावले होते.

  सन 1876 मध्ये अमेरिकेच्या 19 व्या अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या मतदानात रुदरफोर्ड हायेस यांना 185 तर सॅम्युअल टिलडेन यांना 184 मतं मिळाली होती. त्यामुळे हायेस अमेरिकेचे अध्यक्ष झाले.

  ब्रिटनमध्येही असंच घडलं

  ब्रिटिश नेते हेराल्ड मोर यांचं संसद सदस्यत्व केवळ एका मतामुळे गेलं होतं. 1911 ला खरं तर निवडणुकीत मोर चार मतांनी विजयी झाले होते पण आठवड्याभरात त्यांच्या निवडीला आव्हान मिळालं आणि एक मत कमी मिळाल्याने ते पराभूत झाले.

  ..तर जर्मन असती अमेरिकेची पहिली भाषा

  अमेरिकेत 1795 ला अमेरिकेची पहिली भाषा निवडली गेली. त्यावेळी जर्मनीशी संबंधित अनेक श्रीमंत लोक अमेरिकेत होते त्यामुळे जर्मन ही अमेरिकेची पहिली भाषा झाली असती. पण नंतर त्याला विरोध झाल्यावर एक सर्व्हेक्षण झालं त्यात असं लक्षात आलं की फक्त 9 टक्के लोकच पहिली भाषा म्हणून जर्मन वापरतात. बाकी सगळे जास्त इंग्रजी वापरतात. तरीही नंतर मतदान घेण्यात आलं त्यात इंग्रजी भाषेचा एका मताने विजय झाला आणि जर्मनऐवजी इंग्रजी अमेरिकेची भाषा म्हणून निवडून आली.

  First published:

  Tags: Election, Goa Election 2021