बंगळुरू, 15 ऑगस्ट : कर्नाटकातील मंगळुरहून मुंबईला जाणाऱ्या विमानाला उड्डाण करण्यासाठी 6 तासांचा अवधी लागला. या विमानातील एका महिला प्रवासीने केलेल्या तक्रारीनंतर विमानात खळबळ उडाली. या महिलेने शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या मोबाइलवर संशयास्पद मेसेज येत असल्याची तक्रार केली होती. यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आणि सर्वांना तपासण्यात आलं. यानंतर इंडिगोच्या विमानाला रविवारी सायंकाळी मुंबईसाठी उड्डाण करण्याची परवानगी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार करणाऱ्या महिलेने शेजारील प्रवशाच्या मोबाइलवर एक मेसेज पाहिला. ज्यात काहीतरी चुकीचं घडणार असल्याचा संशय आला. तिने विमानाच्या पायलटच्या टीमला याबाबत माहिती दिली. यानंतर पायलटच्या टीमने वरिष्ठांना याबाबत सूचना दिली आणि उड्डाण भरण्याच्या तयारीत असलेल्या विमानाला रोखलं.
भयंकर Video : डोळ्यांसमोर फ्लायओव्हरचा रस्ता खचला, चालकांची तारांबळ; 2 गाड्या थेट दरीत
त्या व्यक्तीलाही रोखलं...
मिळालेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती प्रेयसीसोबत मोबाइलवर चॅट करीत होती. त्यालादेखील त्याच विमानतळाहून बंगळुरूसाठी जायचं होतं. दुसरीकडे त्याची प्रेयसीसाठी बंगळुरूहून निघणार होती. मात्र या चौकशीसाठी या व्यक्तीला विमानात जाऊ दिलं नाही. अनेक तास चौकशी सुरू होती. त्यात त्याच्या प्रेयसीचं बंगळुरूतून विमानही सुटलं होतं.
या सर्व प्रकारानंतर 185 प्रवाशांना पुन्हा विमानात बसवण्यात आलं. आणि सायंकाळी 5 वाजता विमानाने उड्डाण घेतलं. दोघांमधील मेसेजमुळे गैरसमजूत झाल्याचं सांगितलं जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या काळात काही अघटित घडू नये यासाठी सर्वच पातळीवर अधिक काळजी घेतली जात आहे. गैरसमजुतीतून जरी हा प्रकार घडला असला तरी सुरक्षिततेच्यादृष्टीने ते आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Domestic flight, Karnataka, Whatsapp chat