शिमला, 12 ऑगस्ट : तुफान पावसामुळे कालका-शिमला नॅशनल हायवे-5 वर फोरलेन टनलला जोडणारा फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला आहे. या घटनेनंतर हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाच्या दिवसात डोंगराळ भागामध्ये लँड स्लाइडसारख्या घटना होत असतात. याशिवाय ढगफुटी, नदींना पूर येणे आदी गोष्टी होत असतात. गेल्या काही दिवसांपासून खराब वातावरणामुळे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान सोलन येथे पोहोचू शकले नव्हते. कालका-शिमला नॅशनल हाईवे-5 वर बडोग बायपासजवळील टनलला जोडणाऱ्या फ्लायओव्हरचा काही भाग पावसामुळे कोसळला. यादरम्यान नॅशनल हायवेवरुन जाणाऱ्या दोन गाड्या ढिगाऱ्यासह दरीत कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फ्लायओव्हरचा भाग कोसळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचं धुमशान! पुण्याला येलो अलर्ट तर राज्यात दोन दिवस मुसळधार सूचना मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केलं. कार चालक आधीच गाडीतून बाहेर पडला होता. त्यामुळे तो सुरक्षित आहे. या घटनेनंतर फोरलेन निर्माता कंपनीवर सवाल उपस्थित केले जात आहे. सोमवारपासून रस्त्याचा काही भाग कोसळत होता. मंगळवारी रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.
या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये फ्लायओव्हरचा काही भाग कोसळल्याचं दिसत आहे. यानंतर तातडीने गाड्या मागे जाऊ लागल्या. जर गाड्यांचा वेग अधिक असता तर मोठा अपघात घडू शकला असता.