जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बेपत्ता कुत्रा सापडला पण मृतावस्थेत; विरह असह्य झाल्याने मालकानंही संपवलं आयुष्य

बेपत्ता कुत्रा सापडला पण मृतावस्थेत; विरह असह्य झाल्याने मालकानंही संपवलं आयुष्य

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

गेले काही दिवस काही लोक मुक्या जीवांच्या जीवावर उठल्याच्या घटना समोर येत होत्या. रस्त्यावरील कुत्र्यांना (dog) मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर येत होते. मात्र आता काळजाला भिडणारी ही घटना, जिथं एका व्यक्तीनं कुत्र्यासाठी आपला जीव दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 31 ऑक्टोबर : आपल्या मालकासाठी कुत्रा हा प्राणी काहीही करू शकतो. फक्त फिल्ममध्येच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुत्रे आपल्या मालकांसाठी काय काय करतात हे आपल्याला माहिती आहे. असे बरेच व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. माणसांसाठी कुत्रे आपल्या जीवाचीही बाजी लावतात. फिल्ममध्ये तर आपल्या मालकावर होणारे वार कुत्र्याने आपल्या अंगावर झेलल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र आता प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मालकानं जीव दिला आहे. प्राण्यांना लळा लावल्यानंतर त्यांचा माणसांवर जीव जडतो. माणसंही या प्राण्यांमध्ये अडकतात. दोघांनाही एकमेकांपासून दूर जाणं अशक्य होतं. मात्र त्यापैकी एखाद्याचा मृत्यू झाला आणि कायमचं वेगळं व्हावं लागलं तर… मध्य प्रदेशमध्ये एका कुत्र्याच्या मालकावर अशीच वेळ आली. मात्र मृत्यूही त्या दोघांना वेगळं करू शकला नाही. कारण कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकानंही आपल्या आयुष्याचा शेवट केला. छिंदवाडातील ही धक्कदायक घटना. सोनपूरमध्ये राहणारे सोमदेव यांचा पाळीव कुत्रा अचानक गायब झाला होता. दोन दिवसांनंतर त्यांचा कुत्रा सापडला मात्र मृतावस्थेतत. त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाला होता. सोमदेव यांना त्याचा मोठा धक्का बसला. त्यांना आपला मृत कुत्रा पाहून वाईट वाटलं. मात्र फक्त वाईट नाही तर त्यांना इतकं दुख झालं की त्यांनी स्वतचा जीव दिला. सोमदेव यांनी आपल्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर आत्महत्या केली. गळफास घेऊन त्यांनी आपलं आयुष्यही संपवलं. हे वाचा -  जंगल सोडून अस्वल कुटुंबासह शहरात आलं वस्तीला, VIDEO पाहून नागरिकांची वाढली धडधड आज तक च्या रिपोर्टनुसार सोमदेव यांच्या मुलानं सांगितलं, आमच्या घरात एक पाळीव कुत्रा होता. ज्याचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांना कुत्र्याच्या मृत्यूचं दुख होतं. शिवाय ते दारूही प्यायले होते. आम्ही जेव्हा कामावरून घरी परतलो तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची चौकशी केली असता कुत्र्याच्या निधनाच्या दुखात सोमदेव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात