जामनगर, 27 सप्टेंबर: सुसाट वेगाने आलेल्या एका कारने घराच्या कंपाऊंडला जोरदार धडक (speedy car hits compound) दिल्याची घटना घडली आहे. रस्तावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका घराच्या कंपाऊंडवर जाऊन आदळली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारने घराचं मजबूत कंपाऊंट भेदत घराच्या अंगणात प्रवेश केला आहे. या दुर्दैवी घटनेत चालक गंभीररित्या जखमी (car driver injured) झाला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (CCTV Video) झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
संबंधित अपघाताची घटना गुजरातमधील जामनगर येथील आहे. दरम्यान याठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या एका सुसाट कारने घराच्या कंपाऊंडला जोरदार धडक मारली आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरून भरधाव येणारी कार अवघ्या काही सेकंदात घराच्या कंपाऊंडला येऊन धडकली आहे. या दुर्दैवी घटनेत कारचालक गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी कारचालकाला त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
सुसाट कारची घराच्या कंपाऊंडला जोरदार धडक; भीषण अपघाताताचा LIVE VIDEO pic.twitter.com/zn2aw7TXy2
— News18Lokmat (@News18lokmat) September 27, 2021
या भीषण अपघातात घराचं कपाऊंड तर तुटलंच आहे. पण अपघातग्रस्त कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाची बाब म्हणजे या घरासमोर पांढऱ्या रंगाच्या गाडीला काही झालं नाही. सध्या कारचालकावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.