Home /News /national /

राज्याची स्थिती चिंताजनक; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची टोपेंशी चर्चा, सुचवली ही त्रिसूत्री

राज्याची स्थिती चिंताजनक; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची टोपेंशी चर्चा, सुचवली ही त्रिसूत्री

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

या बैठकीत महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थितीबाबत चर्चा झाली. याशिवाय मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सल्ला दिला आहे

    नवी दिल्ली, 6 मे :  महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांतील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूदराबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. या राज्यांतील मृतांचा आकडा कमी व्हावा यासाठी कोरोनाचे प्राथमिक पातळीवर निदान आदी बाबीकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र व गुजरातमधील कोरोनाच्या नियंत्रणासाठी त्रिसूत्री दिली आहे. ते म्हणाले की, प्राथमिक तपासणी, कोरोना बाधिताच्या संपर्कातून पसरण्यावर नियंत्रण आणि आजाराचं तातडीने निदान केल्यास राज्यातील मृत्यूदर आटोक्यात येऊ शकतो. हर्षवर्धन यांची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत हर्षवर्धन यांनी गंभीर श्वसन संक्रमण ( एसएआरआई) आणि इन्फ्लुएंजा या रोगांचे निदान व तपासणीबाबत योग्य पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त केली. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी नियंत्रण रणनीती आखणे, ही राज्यांची प्राथमिकता असायला हवी. कोरोनाचे नवे रुग्ण रोखण्यासाठी योग्य पद्धतीने रोग निवारण, पुढाकार घेऊन तातडीने पावले उचलणे आणि केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे योग्य पालन करणे गरजेचे असल्याची आवश्यकता आहे, असे हर्षवर्धन म्हणाले. काही प्रकरणांमध्ये काही रुग्णांना आजार झाल्याची माहिती लपवली किंवा ते उशिराने रुग्णालयात दाखल झाले, हा मुद्दा बैठकीत अधोरेखित करण्यात आला. कोरोनाबाबत असलेली भीती किंवा बदनामीची शक्यता या कारणांमुळे असे घडले असावे अशी शक्यताही वर्तवण्यात आली. कोरोनाबाबत गैरसमज दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवहार परिवर्तन अभियान राबवण्याची गरजही हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. यामुळे रुग्णांचीं योग्यवेळी माहिती आणि उपचार होण्यास मदत होईल. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या आकडेवारीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. कन्टेटमेंट परिसरात निरीक्षकांच्या टीमसोबतच सामाजिक स्वयंसेवकांची फळीही उभारायाला हवी, ज्यांच्याद्वारे कोरोनापासून सतर्क राहण्याबाबत समाजात जागरुकता निर्माण करणे शक्य होईल. राज्यात औरंगाबाद, पुण्यासह काही जिल्ह्यात हे यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय पथकेही राज्यात तैनात करण्यात येतील आणि केंद्र सरकार योग्य ती मदत करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. संबंधित -गर्लफ्रेंड्स आणि कुटुंबाचा नादच करतोय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या