देशात चायनीज फूडवर घाला बंदी; भारत-चीन तणावानंतर केंद्रीय मंत्र्यांनी केली मागणी

देशात चायनीज फूडवर घाला बंदी; भारत-चीन तणावानंतर केंद्रीय मंत्र्यांनी केली मागणी

भारत-चीन तणावानंतर अनेकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. त्यात आता चायनीजवरही बंदीची मागणी पुढे येत आहे

  • Share this:

मुंबई, 17 जून :  भारत-चीन नियंत्रण रेषेजवळील झालेल्या चकमकीत भारतातील 20 जवानांना वीरमरण आलं. यानंतर भारत-चीन या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अनेकांकडून चीनवरील वस्तुंवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. तर जनतेमध्ये चीनच्या वस्तू खरेदी करू नका अशी मोहीम चालवली जात आहे.

त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या प्रकरणात मागणी केली आहे. त्यांनी भारतातील चायनीज फूडवर बंदी आणा, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म भारतातुन चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. त्यामुळे भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू अशी ताकद भारतीय सैन्यात आहे असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

चीन हे धोका देणारं राष्ट्र आहे. चीनच्या वस्तुंवर बहिष्कार घालण्याची गरज आहे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूडचे हॉटेल्स आणि चायनीज फूडवर भारतात बंदी घालण्याचे आवाहन आठवले यांनी आज केले. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी गो कोरोनाचा नारा दिला होता. त्यांनी दिलेली 'गो कोरोना'ची घोषणा चांगलीच चर्चेत आली होती.

हे वाचा -धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटूची गळफास लावून आत्महत्या

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 17, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading