लखनऊ, 12 फेब्रुवारी : वाहतुकीच्या नियमांबाबत वाहतूक पोलीस दक्ष असतात. अनेकदा एखाद्या गाडीच्या मागे किंवा झाडांमध्ये लपून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना नेमकं हेरण्याचं त्यांचं कौशल्य आहे. पालन न केल्यामुळे चलन कापणे आणि त्यानंतर दंडाची रक्कम भरायला लागू नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची हाजी हाजी करण्याची अनेक प्रकरण तुम्ही आतापर्यंत ऐकली असतील. अशा प्रकरणात चलनची केलेली कारवाई मागे घेतली जात नाही. मात्र आज तुम्ही असा प्रकार पाहणार आहात, जेथे एका विद्यार्थ्यांची विनंती ऐकून पोलिसांचं ह्रदय पाघळलं.
त्याचं झालं असं की नंबर प्लेटमध्ये एक आकडा नसल्याने पोलिसाने एका विद्यार्थ्याच्या बाइकचं चलन कापलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर 5000 रुपयांचा दंड ठोठावला. विद्यार्थ्याची परिस्थिती अगदी जेमतेम होती. त्यामुळे तो इतकी मोठी रक्कम भरणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने तातडीने एसएसपी यांना ट्वीट करुन परिस्थिती सांगितली आणि चलनाची रक्कम माफ करण्याची विनंती केली. ही घटना उत्तर प्रदेशातील इटावा शहरातील आहे.
हे ही वाचा-दीड लाखांचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापलं; नागपूरातील कुटुंब अंधारात
Your chalan has been cancelled. Best wishes. https://t.co/0x4792ylYq
— Akash Tomar IPS (@akashtomarips) February 12, 2021
@akashtomarips सर मदद करें 🙏🙏 pic.twitter.com/x0esSs0AhX
— Deependra Yadav (@Deepend27572523) February 10, 2021
येथे दीपक यादव नावाच्या विद्यार्थ्याने आयपीएस अधिकारी आकाश तोमर यांना ट्वीट करुन सांगितलं की, मी आपली चूक मान्य करतो. माझ्या घरातील परिस्थिती इतकी चांगली नाही. त्यामुळे मी 5000 रुपयांचं चलन भरू शकत नाही. यानंतर दीपेंद्र यादव याच्या ट्वीटवर उत्तर देत आकाश तोमर म्हणाले की, तुझं चलन रद्द केलं जात आहे. शुभेच्छा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Student, Traffic department