मुंबई, 9 मार्च : शेअर बाजारात (Share Market) आज सकाळपासून प्रचंड घसरण होत आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 2000 अंकांची मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा 550 पेक्षा जास्त अंकांनी गडगडला आहे. निफ्टी गेल्या सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange ) Sensory Index Sen-sex आज 626.42 अंकांवर पडला व 36,950.20 वर स्थिरावला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange) निर्देशांक निफ्टी सोमवारी 247.4 वर गडगडला. येस बँकेवरील (Yes Bank) संकट, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि कोरोना व्हायरस (Corona Virus) या संकटाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. बीएसईचा (BSE) सेन्सेक्स सोमवारी पहाटे 9 वाजून 24 मिनिटांनी 3.01 टक्क्यांनी 1131.39 अंकावर गडगडला. तर निफ्टी (Nifty) 2.94 टक्क्यांनी 322.90 अंकांची घसरण झाली. यावेळी निफ्टी - 50 मधील फक्त 5 कंपन्यांचे समभाग ग्रीन मार्कवर (Green Mark) आणि 45 कंपन्यांचे शेअर रेड मार्कवर (Red Mark) व्यापार करताना दिसले. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिल्याने रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध पुकारले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.
Sensex at 36,445.47, down by 1131.15 points. pic.twitter.com/eCEm5hDvd3
— ANI (@ANI) March 9, 2020
निफ्टीच्या 50 समभागांविषयी सांगायचे झाले तर सुरुवातीच्या व्यापारात सर्वात अधिक गती येस बँकेच्या शेअरमध्ये दिसून आली. येस बँकेचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात 16.41 टक्क्यांच्या वाढीसह 18.80 वर व्यापार करीत होते. यानंतर बीपीसीएल सर्वात वेगवान 3.76 टक्क्यांनी वाढत असून तो 418.25 वर ट्रेंड होताना दिसला. दुसरीकडे, निफ्टी - 50 मधील सर्वात मोठी घसरण ओएनजीसी या कंपनीत तब्बल 9.27 टक्के झाली आहे. तो 80.30 वर तो ट्रेंड होताना दिसला. निर्देशांकाच्या सततच्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे काही लाख कोटींचे नुकसान झाले आहे.