मराठी बातम्या /बातम्या /देश /

अलर्ट राहा; नव्या योजनेअंतर्गत सरकारकडून मिळेल 3 लाखांचं बक्षीस

अलर्ट राहा; नव्या योजनेअंतर्गत सरकारकडून मिळेल 3 लाखांचं बक्षीस

नव्या योजनेअंतर्गत बक्षीसाची रक्कम वाढविण्यात आली आहे.

नव्या योजनेअंतर्गत बक्षीसाची रक्कम वाढविण्यात आली आहे.

नव्या योजनेअंतर्गत बक्षीसाची रक्कम वाढविण्यात आली आहे.

जयपूर, 18 ऑगस्ट : देशात गेल्या काही वर्षांत मुलींचा जन्मदर (Birth Rate) तुलनेनं घटला आहे. आपल्या घरात मुलानेच जन्म घ्यावा, अशी काही लोकांची इच्छा याला कारणीभूत ठरली आहे. यातून भ्रूणहत्येच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) आजही गर्भलिंग चाचणी (Gender Test) करण्याचं प्रमाण मोठं आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Government) कसून प्रयत्न करत आहे. गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार (PCPNDT Act) एक योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेतून संबंधितांना बक्षीस (Prize) दिलं जात होतं; मात्र आता या योजनेतून मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे. सरकारच्या या योजनेबाबतचं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने दिलं आहे.

गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी राजस्थान सरकारने आता कंबर कसली आहे. गर्भलिंग चाचणीविषयी माहिती देणाऱ्यास यापूर्वी पुरस्कार देण्यात येत होते; मात्र आता या पुरस्काराची रक्कम वाढवण्यात आल्याची घोषणा राजस्थान सरकारने केली आहे. सरकारने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत मुखबिर योजना (Mukhbir Yojana) सुरू केली आहे. ही योजना प्रामुख्याने राजस्थानमधल्या नागरिकांसाठीआहे. गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी नागरिक सरकारला मदत करू इच्छित असतील, तर त्यांना या योजनेतून प्रोत्साहनपर रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊन गौरविण्यात येणार आहे.

राजस्थान सरकारने गर्भलिंग चाचणीसारखे गुन्हे करणारे डॉक्टर्स किंवा लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत सुरू केलेल्या मुखबिर योजनेंतर्गत मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. गर्भलिंग चाचणी संदर्भात तुमच्याकडे कोणत्याही स्वरूपाची माहिती किंवा सूचना असेल, तर तुम्ही 104/108 या टोल फ्री क्रमांकांवर, तसंच 9799997795 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर देऊ शकता.

हे ही वाचा-पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानी बहिणीची गोष्ट, 26 वर्षांपासून बांधते राखी

मुखबिर योजनेंतर्गत यापूर्वी माहिती देणाऱ्यांना एकूण अडीच लाख रुपये बक्षीस स्वरूपात दिले जात होते. आता गर्भलिंग चाचणी संदर्भात माहिती देणाऱ्यास आणि हे प्रकार रोखण्यासाठी सरकारला मदत करणाऱ्यांना एकूण 3 लाख रुपये बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीत किंवा तक्रारीत तथ्य आढळलं, तर तुम्ही या बक्षीसाला पात्र ठरू शकणार आहेत. यापूर्वी संबंधित गर्भवती महिलेला तीन हप्त्यांत एक लाख रुपये दिले जात होते; मात्र आता या योजनेंतर्गत संबंधित गर्भवती महिलेला दीड लाख रुपये दोन हप्त्यांत दिले जाणार आहेत. तसंच माहिती देणाऱ्यास 50-50 हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये तर त्याच्या सहकाऱ्यास 25-25 हजार रुपये दोन हप्त्यांत प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.

First published:

Tags: Birth rate, Rajasthan