अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी वाराणसी, 25 मे : वाराणसीचे जगदीश पिल्लई यांनी पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे. रामचरित मानस गाऊन जगदीश यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात लांब गाण्याचा विक्रम स्वत:ची नावे केला आहे. संपूर्ण रामचरित मानसवर बनवलेले हे गाणे 138 तास 41 मिनिटे 2 सेकंदाचे आहे. जगदीश पिल्लई यांनी पाचव्यांदा गिनीज बुकमध्ये नाव नोंदवून संपूर्ण जगात काशी आणि भारताचा मान वाढवला आहे. जगदीश पिल्लई यांनी सांगितले की, आतापर्यंत हा रेकॉर्ड अमेरिकेतील एका व्यक्तीच्या नावावर होता ज्याने चर्चमध्ये कोरल गाण्याची पुनरावृत्ती करून सर्वात लांब गाणे रेकॉर्ड केले होते. 2016 मध्ये जेव्हा जगदीश यांना इंटरनेटच्या माध्यमातून याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनीही सर्वात लांब गाणे गाऊन हा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याचा निर्णय घेतला.
अशी सूचली कल्पना - जगदीश यांनी संशोधन सुरू केले तेव्हा त्यांच्या मनात कल्पना आली की भारतात रामचरितमानस आणि रामायण यांसारखी धार्मिक पुस्तके आहेत ज्यात लाखो श्लोक आहेत. या कल्पनेनंतर त्यांनी त्याचा सराव सुरू केला आणि नंतर कठोर परिश्रमानंतर त्यांनी 138 तास 42 मिनिटे 2 सेकंदाचे गाणे तयार केले. 2019 मध्ये सुरू केले काम - जगदीश पिल्लई यांनी 2019 मध्ये रेकॉर्डिंगचे काम सुरू केले होते. त्यानंतर कोरोनामध्ये या कामाला थोडा ब्रेक लागला होता. पण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जगदीश पुन्हा या कामात गुंतले आणि हे काम 2022 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर आता जगातील सर्वात लांब गाणे म्हटल्याने त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

)







