Home /News /national /

कोरोना वॉर्डमधील कोसळणारा धबधबा पाहून रुग्णही झाले हैराण; VIDEO पाहून म्हणाल काय हे?

कोरोना वॉर्डमधील कोसळणारा धबधबा पाहून रुग्णही झाले हैराण; VIDEO पाहून म्हणाल काय हे?

रुग्णांकडे लक्ष न देणं, वॉर्डातील स्वच्छता, पाण्याची व जेवणाची समस्या यांसारख्या अनेक तक्रारी वारंवार कोविड सेंटर्समधून येत आहेत

    लखनऊ, 19 जुलै : देशभरात कोरोनाच्या कहरामुळे नागरिकांचं जगणं अवघड झालं आहे. अशावेळी विविध रुग्णालयांमधील निष्काळजीपणाही चर्चेत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आतापर्यंत आपण वॉर्डमध्ये पाणी भरल्याच्या घटना वाचल्या असतील. आता तर मात्र अगदी धबधबाच वॉर्डमध्ये अवतरल्याने रुग्णांची पंचाईत झाली आहे. बाहेर कोरोना आणि वॉर्डात पाण्याचा धबधबा असं संकट या रुग्णांवर ओढवलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बरेलीतील कोविड रुग्णालय राजश्री मेडिकल कॉलेजमध्ये पावसाचं पाणी धबधबा होऊन कोविड वॉर्डात बरसत असल्याचा हा व्हिडीओ आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की – ही आहे उत्तर प्रदेशातील क्वारंटाईन सेंटरची परिस्थिती. पाणी नाही पण धबधबा बाहतोय. हे वाचा-गटारीनंतरही ‘कडकनाथ’ हवाचं; कोरोना कहरात ठरतोय गुणकारी, मागणी वाढली यापूर्वी काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनीही उत्तर प्रदेशातील कोविड वॉर्डमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये कोरोना वॉर्डमध्ये गटाराचं पाणी भरलं असल्याचं त्यांनी नमूद केलं होते. कोरोना रुग्णांकडे लक्ष न देणं, वॉर्डातील स्वच्छता, पाण्याची व जेवणाची समस्या यांसारख्या अनेक तक्रारी वारंवार कोविड सेंटर्समधून येत आहेत
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या