इंदूर, 19 जुलै : कोरोनाच्या सुरू असलेल्या कहराच्या मध्ये मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्ह्यातील पारंपरिक कोंबडा प्रजाती कडकनाथची मागणी यामध्ये पोषक तत्वांमुळे देशभरात वाढत आहे. मात्र महासाथीमुळे नियमित प्रवासी ट्रेन सुरू असल्याने मालाची ने-आण करणे कठीण जात आहे. त्यामुळे या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे.
झाबुआचे कृषी विज्ञान केंद्राक़डून कडकनाथच्या कोंबड्यांचे संरक्षण आणि अधिक वाढीसाठी काम केलं जात आहे. केवीकेचे प्रमुख डॉ. आयएस तोमकर यांनी रविवारी सांगितले की कोविड – 19 च्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनदरम्यान परिवहनाचे अधिकांश साधन बंद आहेत. त्यामुळे कडकनाथच्या कोंबड्यांची पिल्लांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. मात्र लॉकडाऊन संपताच याची मागणी वाढली आहे.
हे वाचा-अखेर इस्त्रायली जनतेचा बांध तुटला! कोरोनाच्या परिणामामुळे भडकलेले लोक रस्त्यावर
कोंबडीत चरबी आणि कोलेस्ट्रॉल बरंच कमी
त्यांनी सांगितले की केवीके यांनी कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर कडकनाथची कोंबडी (याचा कोणताही वैज्ञानिक अभ्यास झालेला नाही) इतर कोंबड्यांच्या प्रजातीच्या तुलनेत चांगली आहे. कडकनाथच्या काळा रंग आणि मांसमधील चरबी व कोलेस्ट्रॉल बरंच कमी असतं. विशेष म्हणजे यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असतं. कडकनाथच्या चिकनमध्ये स्वादासह औषधीय गुणही आहेत. ज्यामुळे इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
गेल्या अनेक महिन्यापासून देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे येत्या श्रावणातही कडकनाथची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.