जाहिरात
मराठी बातम्या / देश / झाडावर मुलाचं शव पाहून आई हादरली; सोलापूरहून 1400 किमी अंतर पार करुन आला होता लेक

झाडावर मुलाचं शव पाहून आई हादरली; सोलापूरहून 1400 किमी अंतर पार करुन आला होता लेक

झाडावर मुलाचं शव पाहून आई हादरली; सोलापूरहून 1400 किमी अंतर पार करुन आला होता लेक

कोरोनाच्या संकटात या माऊलीचा मुलगा आईच्या सांगण्यावरुन 1400 किमीचं अंतर पार करुन आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 मे : संपूर्ण देशभरात कोरोनाचं संकट आहे. देशात संक्रमिताची संख्या 70000 च्या जवळपास झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये लोक देशातील विविध भागांमध्ये अडकून पडले आहेत. अशातच झारखंडमधील गढवा जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका आईने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला घरी परतल्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास सांगितलं तर त्याने फाशी लावून घेतली. महाराष्ट्रात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला त्याच्या आईने कोरोना व्हायरसच्या संकटामुळे घरी बोलावले. आईच्या म्हणण्यावरुन मुलगा कसाबसा घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर जेव्हा या तरुणाच्या आईने त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास सांगितले तर त्याने आत्महत्याच केली. 1400 किमी प्रवास करुन पोहोचला होता गावी मुकेश कुमार नावाच्या या तरुणाने सोमवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सोलापूरहून 1400 किमीचा प्रवास सुरू केला. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की सर्वजण हेच म्हणातायेत की तुला क्वारंटाईन सेंटरमध्ये राहायला हवं. मात्र तरुण ऐकत नव्हता. त्याने आपल्या आई-वडिलांना काही उत्तर दिलं नाही. थोड्यावेळाने मुकेशने आपल्या आईला विचारलं, ‘आज काय जेवण आहे?’  त्यावर आई म्हणाली, ‘बटाट्याची भाजी आणि भात आहे.’ त्यानंतर मुकेशने आपल्या बॅगेतून एक बिस्किटचा पुडा काढला. त्यातील बिस्कीटं काढली, पाणी प्यायला आणि बॅग घेऊन निघून गेला. बराच वेळ झाला मुलगा घरी आला नाही म्हणून मुकेशची आई चिंता करीत होती. ती त्याला शोधायला घराबाहेर पडली. तर घरापासून काही अंतरावर एका झाडावर तिला मुलाचं शव लटकलेलं दिसलं. त्यानंतर ती जोरजोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने गावकरी जमा झाले. त्यांनी मुकेशला झाडावरुन काढले. मुकेशने आपल्या गमछ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलीस आल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. संबंधित- लेकीसाठी बापाने तयार केला गाडा, गर्भवती पत्नीसह 800 किमी चालत पोहोचले गावी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sucide
  • First Published :
जाहिरात
जाहिरात