भोपाळ, 12 मे : लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेक असे फोटो समोर आले ज्यामुळे डोळ्यात पाणी आलं. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं. यामुळे मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्यानं पैसे मिळत नाहीत. त्यामुळे मजुरांना गावी जाण्याशिवाय पर्याय नाही. गाड्या उपलब्ध नसल्यानं अनेक मजूर पायी गावी निघाले आहेत. यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे.
मध्यप्रदेशातही अनेक मजुर घरी परत चालले आहेत. त्यांचे व्हिडिओ फोटो समोर येत असतात. एका बापाने 800 किमी अंतर मुलगी आणि गर्भवती पत्नीसह चालून घर गाठलं आहे. यात चिमुकल्या मुलीला चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून एक गाडा तयार केला. त्यावर साहित्य आणि मुलीला ठेवलं आहे. गर्भवती पत्नी पुढे चालते आणि चिमुकली बसलेला गाडा ओढत बाप मागून चालत असल्याचं दृश्य डोळ्यात पाणी आणणारं आहे.
बालाघाटच्या सीमेवर हा फोटो टिपण्यात आला. हैदराबादमध्ये नोकरी कऱणाऱा रामू 800 किमी अंतर पार करून बालाघाटमध्ये पोहोचला. हैदराबादमध्ये काम मिळायचं बंद झाल्यानंतर त्यानं परत येण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला काहीच मिळालं नाही. तेव्हा वाटेतच त्यानं एक गाडा तयार केला आणि त्यावर साहित्य आणि 2 वर्षांच्या चिमुकलीला बसवलं. त्या गाड्याला दोरीने बांधून ओढत त्यानं 800 किमीचा टप्पा 17 दिवसांत पार केला.
हे वाचा : कोरोना रुग्णांची सेवा करताना नर्सला लागण, मुलीचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह
पायी प्रवास करत असताना बालाघाटमदील रजेगाव इथं आल्यावर त्याला पोलिसांनी अडवलं. तेव्हा त्यांनाही रामू आणि कुटुंबाची अवस्था पाहून वाईट वाटलं. पोलिसांनी मुलीला खायला आणि चप्पल दिलं. एवढंच नाही तर एक गाडी बघून त्यांना गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली.
हे वाचा : अंगावर थुंकला होता कोरोनाग्रस्त प्रवासी, रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus