Home /News /national /

पोटच्या मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजत राहिली आई, मात्र...

पोटच्या मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजत राहिली आई, मात्र...

आपल्या 26 वर्षीय तरुण मुलाला गमावल्यामुळे आईवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यात व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे तिच्यावर संकट अधिकच वाढलं.

    औरैया, 3 सप्टेंबर : औरैया (Auraiya) जिल्ह्यात पोलिसांच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर येथील पोलिसांवर टीका केली जात आहे. यातून पोलिसांची असंवेदनशीलता समोर आली आहे. एका आईला आपल्या तरुण मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर पावसात थांबावं लागलं, मात्र व्यवस्थेला तिची दया आली नाही.  व्हिडीओतील कुटुंबीयांच्या 26 वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर कायदेशीर कारवाईनंतर  मुलावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र कुटुंबीयाला रात्रभर मुसळधार पावसात मुलाचा मृतदेह घेण्यासाठी वाट पाहावी लागली. मात्र पोलीस आलेच नाहीत. कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी पोलिसांना अनेकदा कायदेशीर कारवाई पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र सूचना दिल्यानंतरही पोलीस रात्रभरातून आलेच नाहीत. रात्रभर मृतदेहासोबत मुसळधार पावसात कुटुंबीय बसून राहिले. सूचना दिल्यानंतरही पोलीस आलेच नाहीत. या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे. आरोग्य विभागाने मृतदेह शवगृहात न ठेवता रात्रभर रुग्णालयाबाहेरील शेडच्या खाली ठेवला. हेही वाचा-पत्नीच्या परीक्षेसाठी 1300 किमी चालवली स्कूटर; पेट्रोलसाठी दागिने ठेवले गहाण उपचारादरम्यान झाला मुलाचा मृत्यू ही घटना अयाना भागातील आहे. येथील सीएचसी रुग्णालयात जीतू नावाच्या 26 वर्षीय तरुणावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी जीतूची गंभीर प्रकृती पाहून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविलं. येथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यापेक्षाही पोलीस प्रशासनाने गंभीर निष्काळजीपणा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सूचना दिल्यानंतर ते कायदेशीर कारवाईसाठी रुग्णालयात आले नाहीत. त्यामुळे रात्रभर जीतूचे कुटुंबीय त्याच्या मृतदेहासोबत पावसात भिजत राहिले. कुटुंबीयांनी सांगितले की रात्री 9.30 वाजता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडून कोणीच पुढे आले नाही.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Person death

    पुढील बातम्या