Home /News /national /

प्रेरणादायी! गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी 1300 किमी चालवली स्कूटर; पेट्रोलसाठी दागिने ठेवले गहाण

प्रेरणादायी! गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी 1300 किमी चालवली स्कूटर; पेट्रोलसाठी दागिने ठेवले गहाण

धनंजयने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले नाही, मात्र पत्नीने शिक्षिका व्हावं, हे त्याचं स्वप्न आहे.

    ग्वालियर, 3 सप्टेंबर :पत्नीच्या आठवणीत डोंगर कापून रस्ता तयार करणाऱ्या बिहारमधील दशरथ मांझी (Dashrath Manjhi) ची गोष्ट आजही लोक विसरू शकत नाही. दशरथ मांझीप्रमाणेच झारखंडमधील धनंजय मांझी यांने गर्भवती पत्नीला परीक्षा देण्यासाठी 1300 किमी स्कूटर चालवली, इतकचं नाही तर धनंजय झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील पत्नीला घेऊन स्कूटरने तीन दिवसांत मध्य प्रदेशातील ग्लावियरला पोहोचला. ते तीन दिवस होते अवघड झारखंडपासून तीन दिवस स्कूटर चालवत धनंजय आपल्या गर्भवती पत्नीला सोनी हेम्बरमला डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी ग्वालियर पोहोचला. धनंजय झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील गाव गन्टा टोलाचा राहणारा असून त्याचं घऱ बांग्लादेशाच्या सीमेपासून 150 किमी दूर आहे. धनंजय तब्बल 1300 किमी स्कूटर चालवत झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशातील विविध डोंगराळ-मैदानी रस्ता पार करीत मध्य प्रदेशातील ग्वालियर पोहोचला. धनंजयने सांगितले की एके ठिकाणी मुसळधार पावसामुळे आम्ही झाडाच्या खाली 2 तासांपर्यंत उभे होते. बिहारपासून भागलपूरहून जात असताना पूराचा सामना करावा लागला. अनेक शहर आणि गावांमध्ये खड्डेमय रस्त्यांवरुन जावे लागले. खड्ड्यांमुळे खूप त्रास झाला. मुज्जफ्फरपूरमध्ये एका रात्री लॉज आणि लखनऊमध्ये एका रात्री टॅक्स बॅरिअरवर थांबले होते. मात्र सुखरुप पोहोतले. हेही वाचा -'तुम्ही खूप काही शिकवलं...' मराठीच्या शिक्षकांच्या निधनानंतर आमीरची भावुक पोस्ट बायको शिक्षिका व्हावी ही 8 वी पास धनंजयची इच्छा धनंजय एक कँटिनमध्ये आचारीचं काम करतो आणि गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार आहे. स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धनंजयने आपल्या पत्नीचे दागिने 10000 रुपयांत गहाण ठेवले. धनंजय स्वत: दहावी पासदेखील नाही, मात्र पत्नीने शिक्षिका व्हावं अशी त्याची मनापासून इच्छा आहे. यासाठी पत्नी सध्.या डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन द्वितीय वर्षाची परीक्षा देत आहे. धनंजय आणि सोनी यांचं लग्न डिसेंबर 2019 मध्ये झाली. यावर धनंजयने सांगितले की, दशरथ मांझीकडून त्यांना प्रेरणा मिळाली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या