जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक: कोरोनामुळे 12 कोटी मुलांना दोन वेळचं जेवणही मिळणे होणार अवघड

धक्कादायक: कोरोनामुळे 12 कोटी मुलांना दोन वेळचं जेवणही मिळणे होणार अवघड

कोरोनाचा धोका फार काळ लांबू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरोनाच्या 6 महिन्यांच्या अभ्यासानंतर आरोग्य संघटनेने असा इशारा दिला आहे.

कोरोनाचा धोका फार काळ लांबू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरोनाच्या 6 महिन्यांच्या अभ्यासानंतर आरोग्य संघटनेने असा इशारा दिला आहे.

पुढच्या पाच वर्षांमध्ये पुरेसं अन्न आणि आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे अशा मातांच्या मृत्यूचं प्रमाणही मोठं असेल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 24 जून: कोरोनामुळे (Covid-19 Pandemic) जगभर लाखो लोकांचा बळी जात आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. आता याचा फटका लहान मुलांनाही बसणार आहे. दक्षिण आशियातल्या (South Asian Countries)  8 देशांमध्ये पुढच्या वर्षभरात 12 कोटी मुलं गरिबीच्या खाईत लोटली जाणार आहेत. UNICEF ने त्यासंबंधीचा अहवाल दिला आहे. या आठ देशांमध्ये अफगानिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाल, भूतान, बांग्लादेश, मालदीव आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. कोरोनामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लावलं गेलं आणि त्यामुळे सगळी अर्थव्यवस्थाच ठप्प झाली. छोटे व्यवासाय बंद पडले. कारखाने बंद पडले. कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला. त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या कामगारांना पडला असून त्यांच्या मुलांचं भविष्य अंध:कारमय  झालं आहे. त्यांना किमान दोन वेळचं जेवण, आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सोयी असं काहीही उपलब्ध होऊ शकणार नाही असं UNICEF ने म्हटलं आहे. अशा गरीब मुलांची संख्या तब्बल 36 कोटी आहे असंही त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून पुढच्या पाच वर्षांमध्ये पुरेसं अन्न आणि आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे अशा मातांच्या मृत्यूचं प्रमाणही मोठं असेल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात