जाहिरात
मराठी बातम्या / देश / पैसे कमी असल्यानं ऑपरेशननंतर टाके घालण्यास डॉक्टरांनी दिला नकार, चिमुकलीचा मृत्यू

पैसे कमी असल्यानं ऑपरेशननंतर टाके घालण्यास डॉक्टरांनी दिला नकार, चिमुकलीचा मृत्यू

पैसे कमी असल्यानं ऑपरेशननंतर टाके घालण्यास डॉक्टरांनी दिला नकार, चिमुकलीचा मृत्यू

उपचारासाठी पूर्ण पैसे नसल्यानं या रुग्णालयानं मुलीला ऑपरेशन टेबलवरुन पोटाला टाके न घालता तसंच बाहेर काढलं. अशात पैशांमुळे उपचार थांबल्यानं (Doctors Refused Rreatment) प्रकृती खालावून या चिमुकलीचा मृत्यू झाला

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रयागराज 06 मार्च : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात शनिवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथे एका खासगी रुग्णालयाच्या अमानवीय व्यवहारामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमावावा लागला आहे. कुटुंबाकडे उपचारासाठी पूर्ण पैसे नसल्यानं या रुग्णालयानं मुलीला ऑपरेशन टेबलवरुन पोटाला टाके न घालता तसंच बाहेर काढलं. अशात पैशांमुळे उपचार थांबल्यानं (Doctors refused treatment) प्रकृती खालावून या चिमुकलीचा मृत्यू झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. प्रयागराजच्या करेली भागात राहाणाऱ्या ब्रह्मदीन मिश्रा यांची 3 वर्षाची मुलगी पोटाच्या आजारानं ग्रस्त होती. उपचारासाठी आई वडिलांनी तिला धूमनगंजच्या रावतपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ऑपरेशसाठी दीड लाख रुपये दिल्यानंतरही रुग्णालयानं 5 लाखांची मागणी केली. हे पैसे जवळ नसल्यानं रुग्णालयानं चिमुकलीसह संपूर्ण कुटुंबीयांना बाहेर काढलं आणि इथं उपचार होऊ शकणार नाही, असं सांगितलं. वडील आपल्या मुलीला घेऊन अनेक रुग्णालयांमध्ये गेले. मात्र, सगळ्या रुग्णालयांनी मुलीला भर्ती करून घेण्यास नकार दिला. मुलीची स्थिती अतिशय गंभीर असून तिचा जीव वाचणार नाही, असं रुग्णालयांनी सांगितलं. मुलीच्या वडिलांचा असा आरोप आहे, की डॉक्टरांनी ऑपरेशननंतर टाके न टाकताच त्यांच्या मुलीला रुग्णालयाबाहेर काढलं. याच कारणामुळे इतर रुग्णालयांनी तिला दाखल करुन घेण्यास नकार दिला आणि उपचाराअभावी तिला आपला जीव गमवावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात