प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 18 सप्टेंबर : काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रूममध्ये आज बैठक झाली. बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते सहभागी झालेत. आजच्या बैठकीत जवळपास 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला. पहिल्या 50 उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण झालं असून प्रत्येक दोन्हीही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर निवडणूक लढविणार असून मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडणार आहेत. राज्यातली बदलती समिकरणं लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या राज्यातल्या बड्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरा असा आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली. जे नेते कधी विधानसभा निवडणुक लढले नाहीत त्यांनाही मैदानात उतरविण्याचा काँग्रेसचा विचार आहे. मात्र हे नेते हा आदेश ऐकणार का हाच खरा प्रश्न आहे.
Maharashtra Congress President, Balasaheb Thorat: The first list of 50 Congress candidates for Maharashtra Assembly elections will be out by September 20. (file pic) pic.twitter.com/SeZYS0yDGI
— ANI (@ANI) September 18, 2019
अयोध्याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये निकाल? SCकडून युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी डेडलाईन राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पडझड रोखून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये आज शरद पवार यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र आता या जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसंच परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. कोणत्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुणाला दिली उमेदवारी? परळी - धनंजय मुंडे बीड- संदीप क्षीरसागर माजलगाव - प्रकाश सोळके गेवराई - विजयसिंह पंडित केज - नमिता मुंदडा मुंबईत मनसे कार्यकर्त्याला अटक, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप शरद पवार यांनी निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारण मोठे चुरशीचे होणार आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीला आता भाजप कसे उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या माध्यामातून पुन्हा एकदा भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या या रणनीतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा राज्याचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे. ही शरद पवार हे सध्या राज्याच्या दौरा करत आहेत. या दौऱ्यावेळीच पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबद्दल भाष्य केलं आहे. ‘तुम्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते आता पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का?’ असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ‘या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजितबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येतं.’